रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि. 8 ( विनायक जहुरे )रावेर आणि पुनखेडा या दोन गावांदरम्यान असणारा 2 ते 2 .5 किलोमीटर लांबचा रस्त्याचा तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी गावकरी आणि वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या रस्त्याची दुर्दशा इतकी दयनिय अवस्थाआहे की ,वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
रावेर-पुनखेडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाच्या काळात साइड पट्टीवर खोदलेल्या खड्यांमुळे मोठ्या प्रमाणात चिखल रस्त्यावर पसरलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिवसा आणि रात्री वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, या रस्त्याचा परिसर केळी उत्पादकांचा असल्याने, केळी भरायला येणाऱ्या परप्रांतिय ट्रक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच रावेर तालुक्यातील 8 ते 10 गावांतून दिवसातून शाळा जाणारे विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि इतर लोक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची दयनिय अवस्था झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
रस्ता खराब झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असून, वाहनधारकांना सतत जोखमीमध्ये वाहन चालवावे लागत आहे. ग्रामस्थांनी आणि वाहनधारकांनी संबंधित विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, रस्त्याची दुरुस्ती काम ताबडतोब सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा अधिक गंभीर दुर्घटनांचा धोका वाढेल. या क्षेत्रातील नागरिकांची दैनंदिन जीवनच नाही तर आर्थिक गतिशीलता सुद्धा या रस्त्याच्या स्थितीवर अवलंबून असल्याने दुरुस्ती कार्य अत्यंत आवश्यक आहे.
रावेर-पुनखेडा रस्त्याची वाईट स्थिती हा केवळ वाहतूकविषयक नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी आणि इतर मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याने, प्रशासनाने दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. प्रशासनाने या तक्रारींकडे लक्ष देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी जनतेकडून आशा व्यक्त केली आहे.























