Homeताज्या बातम्यारावेर-पुनखेडा–पातोंडी रस्त्याचे काम अपूर्ण; धुळीमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त...

रावेर-पुनखेडा–पातोंडी रस्त्याचे काम अपूर्ण; धुळीमुळे शेतकरी व नागरिक त्रस्त…

रावेर दि .9 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा–पातोंडी हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर टाकलेला खळी मुरूम व सैल मातीमुळे वाहनांची वर्दळ वाढताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसर धुरकट झाल्याचे चित्र आहे.

या उडणाऱ्या धुळीचा मोठा फटका रस्त्यालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांवर धूळ साचत असल्याने पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

“रस्त्याचे काम सुरू केले पण पूर्ण केले नाही. आमच्या शेतातील पिकांवर सतत धूळ बसत आहे. यामुळे पिके खराब होत असून कोण जबाबदार आहे?”

तर दुचाकीस्वार नागरिक कौशल पाटील म्हणाले,

“धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नाही. डोळ्यांना जळजळ होते आणि अपघात होण्याची भीती कायम असते.”

पुनखेडा पातोडी महिला ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले,

“लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”

अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे ना सुरक्षित वाहतूक होत आहे ना शेतकऱ्यांचे नुकसान थांबत आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करून डांबरीकरण करावे व धुळीचा त्रास थांबवावा, अशी जोरदार मागणी पुनखेडा, पातोंडी व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!