Homeताज्या बातम्यारावेर नगर परिषद घनकचरा ठेकेदार  आर.एम. भालेराव चाळीसगाव यांचा ठेका: बिल देण्यात...

रावेर नगर परिषद घनकचरा ठेकेदार  आर.एम. भालेराव चाळीसगाव यांचा ठेका: बिल देण्यात अनियमितता … स्पेशल ऑडिटची मागणी

रावेर (प्रतिनिधी) दि . 16 रावेर नगर परिषद घनकचरा व्यवस्थापनासाठी सन 2021/22 मध्ये ठेकेदार आर.एम. भालेराव, चाळीसगाव यांना ठेका देण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराच्या बिला संदर्भात अनियमितता दिसून येत असून, याबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठेकेदाराच्या बिलाच्या व्यवहारांमध्ये संशय

आर.एम. भालेराव यांनी ठेका घेऊन ठरलेल्या दराने दर महिन्याला ट्रॅक्टर भाड्याने 18 हजार रुपये रुपये प्रति माह प्रमाणे बिल देणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदार बिल मिळेपर्यंत बिल प्रस्तुत करीत नव्हता. यामुळे चार ते पाच महिने होऊन ही बिल मिळत नव्हते. एकदा बिल मिळाल्यानंतर ही, ऑनलाईन पद्धतीने ठेकेदाराच्या खात्यामधून बिल देण्याऐवजी, आपल्या मर्जीतील कर्मचार्यांच्या माध्यमातून बिल दिले जात होते.त्याचबरोबर, जी.एस.टी. इनकम ट्रॅक्स भरत असतानाही बिल दुसऱ्या खात्यातून का दिले जात होते, हा प्रश्न ही उभा राहिला आहे. या संदर्भात आरोप आहेत की, बिल व्यवहारांमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे शक्यतो आर्थिक भ्रष्टाचार किंवा अन्य अनियमितता दिसून येत  आहे .

ठेकेदाराचा ठेका सोडल्यावर ही अद्याप बिल अद्ययावत नाही

ठेकेदाराने ठेका सोडल्यावर ही बिल अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या कारणामुळे नगरपरिषद आणि नागरिक यांना आर्थिक व्यवस्थापनात अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुख्याधिकारीं कडून तपासणी व स्पेशल ऑडिटची मागणी

या संदर्भात अनेक बाजूंनी ठराविक चौकशी करण्याची व ठेकेदार आर.एम. भालेराव यांची स्पेशल ऑडिट करण्याची मागणी आहे. जर या ऑडिटमध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळला तर दोषींना काळ्या यादीत समाविष्ट करून कठोर कारवाई करण्यात यावी .

रावेर नगर परिषद घनकचरा व्यवस्थापनासंबंधी ठेकेदारांसमोर महत्त्वाची आर्थिक जबाबदारी असते. मात्र, ठेकेदार आर.एम. भालेराव यांच्याकडून बिल देण्यात झालेली अनियमितता रावेर नागरिकांसाठी गंभीर आहे. ऑनलाईन बिल प्रक्रिया आणि संतुलित आर्थिक व्यवहार सुनिश्चित केल्याशिवाय यंत्रणेत पारदर्शकता येणे कठीण असेल. त्यामुळे या प्रकरणात गंभीर चौकशी होणे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे.

रावेर नगर परिषदेतील या घनकचरा व्यवस्थापनातील घडामोडींवर आम्ही पुढील अपडेटसाठी सतत लक्ष ठेवत राहू. अधिक माहितीसाठी आणि स्थानिक घडामोडींवर थेट अहवालांसाठी आमच्या लक्षवेध न्युजला फॉलो करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!