रावेर (प्रतिनिधी ) दि 28 रावेर नगर परिषदेच्या धनकचरा ठेकेदाराविरुद्ध आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर भागातील हजारो टन धनकचरा वाहून नेण्याच्या कामात गंभीर अनियमितता अन् गैरव्यवस्था सुरू असल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून कोणता ही कठोर पाऊल उचलले जात नाही, तर दर महिन्याला ठेकेदाराला मुदतवाढ देत राहणे का ? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
हजारो टन धनकचराचा परस्पर विल्लेवाट तरी ही बिल अदा
नगरपालिकेने धनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदाराला जबाबदारी दिली आहे, मात्र त्या ठेकेदाराच्या कामकाजात गंभीर तक्रारी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी हजारो टन धनकचरा एकत्र होऊन परिसरात साचलेला असून, त्यामुळे संक्रमणाचा धोका आणि स्वच्छता प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर विषयाकडे नगरपालिका व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
आरोग्य निरीक्षक फक्त नावाला ?
धनकचरा व्यवस्थापनाविषयी पर्यवेक्षण करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा गंभीर आरोप आहे. “आरोग्य निरीक्षक फक्त नावाला आहेत, प्रत्यक्ष तपासणी किंवा कारवाई होत नाही,” असे तक्रारदारांनी स्पष्ट केले. या अनियमिततेमुळे शहरात वाढती कचरा कूड समस्या अजूनही कायम आहे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्था धुळे यांच्यावर कोणती कारवाई का नाही?
रावेर नगर परिषदेने धनकचरा व्यवस्थापनासाठी आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्था, धुळे या संस्थेकडे जबाबदारी दिली आहे. मात्र या संस्थेच्या कामकाजात ही गंभीर तडजोडी आढळून येत आहेत. आता प्रश्न असा की, अशा स्थितीत या संस्थेविरुद्ध आत्तापर्यंत कोणतीही कारवाई का होत नाही ? यावर प्रशासकीय यंत्रणा सुद्धा गूढ बनल्याचे दिसते. स्थानिकांना प्रश्न पडला आहे की, कायद्याच्या उल्लंघनावर बिनधास्तपणे मुदतवाढ देणे व नियम लागू न करणे उचित आहे का?
रावेर नगर परिषदेच्या धनकचरा व्यवस्थापनातील या मोठ्या भ्रष्टाचाराला व गैरव्यवस्थेला यंत्रणा दिलेले संरक्षण चिंता निर्माण करणारे आहे. हजारो टन धनकचरा परिसरात साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता दोन्हीच अधोरेखित होत आहे. आरोग्य निरीक्षक आणि सहकारी संस्था आस्थेच्या कामकाजाविषयी प्रशासनाने गंभीरपणे विचार करावा व कठोर कारवाईची आवश्यकता आहे. असे नाही तर हे क्षेत्र अधिकच प्रदूषित होईल आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
रावेर नगर परिषद, धनकचरा ठेकेदार, धनकचरा व्यवस्थापन, आस्था स्वयंम रोजगार सहकारी संस्था धुळे, आरोग्य निरीक्षक, मुदतवाढ, धनकचरा तक्रारी, नगरपालिकेतील भ्रष्टाचार, स्वच्छता समस्या रावेर, धनकचरा कारवाई























