Homeताज्या बातम्यारावेर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रांमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासन अनभिज्ञ...

रावेर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रांमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासन अनभिज्ञ…

रावेर दि .22 (प्रतिनिधी ) रावेर शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उभा आहे. शहरातील विविध भागांमध्ये घाण आणि कचऱ्यामुळे नागरिकांचे जीवन संकटात आले आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर माझी वसुंधरा योजनेत नगर परिषद राबवत असून देखील कोणती ही जबाबदारी न घेतल्याने आज रावेर शहराचा आरोग्य आणि स्वच्छता प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

शहर परिसरातील घाणीची स्थिती

श्रीकृष्ण कॉलनी, अष्टविनायक नगर, स्वामी समर्थ केंद्र, नाईक कॉलनी, गट क्रमांक ५०८ बी १, विद्या नगर, सोनू पाटील नगर, शनी मंदिर कॉलनी, मराठा मंगल कार्यालय, आदर्श नगर, रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, शिक्षक कॉलनी, स्टेशन रोड, केदारेश्वर महादेव मंदिर गट क्रमांक ७७, माजी सैनिक हॉल, बुरहानपूर रोड, पेट्रोल पंपासमोरील कॉलनी, व्हीएस नाईक कॉलेज परिसर यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये सध्या घाणेरडी आणि कचऱ्याचा मोठे ढीग दिसून येत आहे. नाल्यांत सर्वत्र कचरा साचल्यामुळे डासांची संख्या प्रचंड वाढली आहे आणि जलजन्य आजारांची उत्पत्ती होत आहे. या घाणेरडींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरी देखील नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अधिकारी लक्ष देत नाहीत, नागरिक संतप्त

नगरपरिषदेचे आरोग्य विभाग व कंत्राटदार यांच्याकडून स्वच्छतेबाबत गंभीर उपेक्षा दिसून येत आहे. डासांच्या मुळे वाढणाऱ्या जलजन्य आजारांमुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी चिंताजनक ठरली आहे. मात्र, प्रशासनाकडून या संदर्भात काही ही उपाययोजना होत नाहीत. नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे आवाज उठवला तरी ही प्रतिसाद नाही मिळत. याबाबत अजित पवार गटाचे प्रणीत महाजन, उबाठा गटाचे राकेश घोरपडे, राष्ट्रवादीचे मयूर पाटील यांनी पालिकेच्या मनमानी कारभार लक्ष वेधले असून विभागांच्या स्वच्छतेसाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्वच्छतेच्या अभावी वाढते आरोग्य दुष्परिणाम

स्थानिक नागरिक म्हणतात की, “परिसरातील कचरामुळे डासांमुळे प्रसार होणाऱ्या आजारांची संख्या वाढली आहे आणि रुग्णालयात रुग्णांचा ओघ वाढला आहे.” स्वच्छतेच्या अभावामुळे फक्त आरोग्य धोक्यात येत नाही, तर शहराचा दृष्य सुध्दा नालायक अवस्थेत दिसतो आहे.

ठेकेदार व आरोग्य निरीक्षकांच्या निष्काळजीपणाचे परिणाम

राकेश घोरपडे (उबाठा) यांनी नमूद केले की, ठेकेदार आणि आरोग्य निरीक्षक स्वच्छतेची जबाबदारी अक्षरशः फेटाळत आहेत. ठेकेदार ‘गैरव्यवहार’ करत असून, कमी कर्मचारी कार्यरत असण्याकारणाने विभागातील स्वच्छता व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यांनी मुख्याधिकारी घनकचरा ठेकेदार तसेच आरोग्य अधिकारी यांच्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रशासनाकडून त्वरित लक्ष देण्याची गरज

स्वच्छतेचा प्रश्न रावेर मुळे केवळ शहरातील सौंदर्य हानीकारक ठरत नाही, तर येथील नागरिकांच्या आरोग्यावर ही मोठा परिणाम होत आहे. यासाठी नगरपरिषदेने आरोग्य विभाग, कंत्राटदार आणि सफाई कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. अधिकारी आणि प्रशासनाने लवकरच जागरूक होऊन प्रभावी आणि धडक कारवाई करावी लागेल, नाही तर हि परिस्थिती आणखी दिवसें दिवस बिकट होईल. नागरिकांनी हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे आणि स्वच्छ रावेरसाठी विशेष प्रयत्न राबवले पाहिजेत.

रावेर शहरात स्वच्छता समस्या
– नगर परिषद प्रशासन अभिज्ञ
– जलजन्य आजार
– नाल्यांमधील कचरा
– रावेर कचरा व्यवस्थापन
– स्वच्छतेसाठी पालिका कारवाई
– आरोग्य विभाग निष्काळजीपणा
– विभागांतील घाण
– ठेकेदार गैरव्यवहार
– रावेर स्थानिक स्वच्छता योजना

रावेर सारख्या शहरांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे आणि यासाठी प्रशासनाकडून तत्परता आवश्यक आहे. यामुळेच प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेसाठी जागरूक होऊन प्रशासनावर दबाव आणण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या शहरातील परिसर आरोग्यदायी आणि स्वच्छ बनेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!