Homeशिक्षण-प्रशिक्षणरावेर नगरपरिषदेला ५२ लाखांची अभ्यासिका मंजूर — आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना...

रावेर नगरपरिषदेला ५२ लाखांची अभ्यासिका मंजूर — आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश

रावेर दि .18 ( प्रतिनिधी ) नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत रावेर नगरपरिषदेसाठी ५२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षार्थ्यांना एक सुसज्ज अध्ययन केंद्र मिळणार आहे.

रावेर शहरात दर्जेदार आणि शांत वातावरणातील अभ्यासिकेची आवश्यकता अनेक वर्षांपासून जाणवत होती. शहरातील विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शासनाने हा निधी मंजूर केला आहे.

अमोलभाऊ जावळे यांना स्वतःलाही शिक्षण आणि अभ्यास याबाबत विशेष आकर्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सक्षम पायाभूत सुविधा मिळाव्यात, ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे. या अभ्यासिकेमुळे रावेर व परिसरातील युवकांना शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या मंजुरीमुळे रावेर शहरात समाधान व्यक्त होत असून, नागरिक आणि विद्यार्थी वर्गाने आमदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. लवकरच ही अभ्यासिका अत्याधुनिक सोयीसुविधांसह ज्ञानकेंद्र म्हणून उभारली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!