Homeआरोग्यरावेर नगरपरिषदेची नाले सफाई थातुरमाथुर ...नागझिरी नाल्याची पूर्ण सफाई करण्याची नागरिकांची मागणी

रावेर नगरपरिषदेची नाले सफाई थातुरमाथुर …नागझिरी नाल्याची पूर्ण सफाई करण्याची नागरिकांची मागणी

रावेर (प्रतिनिधी ) दि . 29 रावेर नगरपरिषदेच्या नाले सफाई मोहिमेत थातुरमाथुरपणा दिसून आला आहे. नागझिरी नाल्याच्या फक्त समोरील भागाची वरवर सफाई करण्यात आली असून, गाळ तसेच घाण अजून ही अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात पडलेली आहे. नागरिकांकडून याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करीत नगरपरिषदेवर नाल्याची पूर्ण सफाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.

नागझिरी नाल्याच्या सफाईसाठी फक्त एका दिवसासाठी फोकलॅड मशिनचा वापर करून नाल्याच्या समोरील भागाचा गाळ गोळा करण्यात आला. परंतु, यामुळे नालेमधील घाण आणि गाळाचा संपूर्ण नाश होणे शक्य झालेले नाही. लक्षवेध न्यूजच्या दणक्याने सदर कामाला गती मिळाली असून, गोळा केलेल्या गाळाचे फेकण्याचे काम सुरु झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, काही दिवसांनी पुन्हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ नाल्याच्या बाजूला भरताना दिसून आला आहे, ज्यामुळे सफाई अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.

नगरपरिषदेवर नागरिकांनी टीका केली असून, नागझिरी नाल्याची संपूर्ण सफाई करण्याची मागणी केली आहे. फक्त समोरील भागाची सफाई करून काम पूर्ण झाले परंतु नागरिकांची अशी अपेक्षा आहे की नाल्याची पुर्णपणे सफाई झाली पाहीजे अजुन ही नाल्यात प्रचंड गाळ साचलेला आहे . त्यामुळे नाल्याच्या किनारावर राहणाऱ्या लोकांना या दुर्गंधीमुळे धोका निर्माण झाला आहे .

रावेर नगरपरिषदेने नागझिरी नाल्याच्या नाले सफाईसाठी एक महत्त्वाची आणि दीर्घकालीन योजना आखणे गरजेचे आहे. फक्त वरवरची सफाई करून नागरिकांची समस्या दूर होणार नाही. नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी नाल्याची पूर्ण, व्यवस्थीत सफाई करणे आवश्यक आहे. नागझिरी नाल्याची पूर्ण सफाई झाल्याशिवाय येत्या पावसाळ्यात पाणी साचण्याचे आणि सांडपाणी प्रवाहात अडथळा येण्याचे धोके कायम राहतील. नागरिकांची हक्काची मागणी आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!