रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .16 रावेर येथील नगरपरिषदेच्या नाले सफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील आठवडयात नागझिरी नाल्यातील गाळ फक्त एक दिवस पोकलॅडच्या साह्याने मोजून एक दिवस जमा करण्यात आला. मात्र, हजारो टन गाळ नाल्यामध्येच पडून आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीच्या त्रासाने सतत त्रस्त होत आहेत. लोकांना नाला स्वच्छ करण्याच्या ऐवजी फक्त थातुरमाथुर देखावा असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
नागझिरी नाल्यातील गाळ सफाईत कोठेच प्रगती नाही
नाले सफाईसाठी वापरलेलं पोकलॅड केवळ दोन दिवस बंद सुरू काम करून जमा झालेला गाळ फेकण्यात आला. मात्र, नाला कडेला लावलेला हजारो टन गाळ अजून ही उचललेला नाही. या गाळामुळे केवळ प्रदुषणच नाही तर परिसरात दुर्गंधीने नागरिकांचा त्रास वाढला आहे. खास करून नागझिरी नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरीकांनी प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नगरपरिषदेतील मनमानी प्रशासन
मुख्याधिकारी अभिजित कदम यांची बदली होण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे ते नगरपरिषदेच्या कामकाजाकडे इच्छेनुसारच लक्ष देत असल्याची चर्चा आहे. या कारणामुळे सफाई कामांमध्ये मनमानी कारभार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे वातावरणातील या रोगदायी दुर्गंधीला जर लवकरच उचलले नाही तर नागरीकांचा रोख वाढण्याचीही शक्यता आहे. नाले सफाई फक्त नाट्यमय देखाव्यापुरती मर्यादित ठेवून लोकांना फसवण्याचे कारस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेचा प्रशासन आणि नागरिकांची समस्या
रावेर नगरपरिषदेच्या नाले सफाई कामाचा आढावा घेतल्यास दिसून येतो की, हे कार्य सध्याच्या स्वरूपात फक्त देखावूपणा करून वरिष्ठ अधिकारी बदलीच्या हालचाली मुळे मनमानी कारभार चालू आहे. हजारो टन गाळ नाल्यातून काढून बाहेर टाकण्याची जबाबदारी पूर्ण होत नसेल तर नागरीकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता गंभीर धोक्यात येत आहे. नगरपरिषदेने तातडीने योग्य ती धोरणे आखून नाले स्वच्छतेबाबत उपाय योजना कराव्या, अन्यथा निवडणुकीपूर्वी लोकशाही प्रक्रियेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

या गंभीर समस्येवर प्रशासनाने त्वरित हातोडा घालून नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नाहीतर रावेर नागरिकांची कायमची नापसंती वाढत राहणार आहे.























