Homeताज्या बातम्यारावेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह राबवणार; तहसिलदार बंडू...

रावेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह राबवणार; तहसिलदार बंडू कापसे यांची माहिती ; सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

रावेर दि . ३० (लक्षवेध न्युज नेटवर्क ) महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने महसूल सप्ताहाचे आयोजन करणार असल्याची माहिती तहसिलदार बंडू कापसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान हा महसूल सप्ताह राबवण्यात येणार असून याअंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना तहसिलदार कापसे म्हणाले की, “महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटप ही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसाठी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर लागणार नाही,” असा महत्त्वाचा निर्णय ही घेण्यात आला आहे.

२ ऑगस्ट रोजी ३१ डिसेंबर २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार 

आहेत. ‘प्रधानमंत्री सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ मिळेल. ३ ऑगस्ट रोजी ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण होईल आणि झाडे तोडल्यास वनविभागाच्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. येत्या पाच वर्षांत एकही शेत रस्त्याविना राहणार नाही,” असे ही कापसे यांनी सांगितले.

४ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन होऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. आधार कार्ड, संजय गांधी योजना ओळखपत्र, अधिवास, जात, उत्पन्न आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप होईल. वर्षातून चार वेळा अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच ५ ऑगस्टला DBT च्या अडचणी दूर करण्यात येणार आहेत. तर ६ ऑगस्ट रोजी शर्तभंग जमिनी परत घेणार असल्याचे सांगितले. ७ ऑगस्ट रोजी कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ होईल असे तहसिलदार बंडू कापसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे , नायब तहसीलदार आर. डी. पाटील हेही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!