Homeताज्या बातम्यायावल BDO डॉ. मंजुश्री गायकवाड यांची तात्काळ बदली करण्यात यावी - शिवसेना...

यावल BDO डॉ. मंजुश्री गायकवाड यांची तात्काळ बदली करण्यात यावी – शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची मागणी  बदली न झाल्यास अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

यावल दि 31तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या मनमानी व दडपशाहीच्या कारभाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्यासोबत गायकवाड यांचे असभ्य वर्तन आणि बेजबाबदार प्रशासकीय कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, तालुका प्रमुख राजू काटोके, राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवकचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, आकाश चोपडे यांच्यासह शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकारी ब. का. पवार यांची भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाने गायकवाड यांच्या कारभाराविषयी सविस्तर तक्रारी मांडत त्यांच्या बदलीची मागणी केली. नागरिक, पदाधिकारी व पत्रकार यांना मिळणारी अशोभनीय वागणूक, प्रलंबित तक्रारींचे निवारण न होणे, ग्रामस्थांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर पवार यांच्यासमोर संताप व्यक्त केला असुन शिष्टमंडळाने इशारा देत तात्काळ यावल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी, केली असतांना बदली न झाल्यास शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी शिष्टमंडळात नितीन सोनार, जुगल पाटील, राजू काटोके, आकाश चोपडे, सागर सपकाळे, राजू सपकाळे, किरण महाजन, मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, बा. का. पवार यांनी शिष्टमंडळाशी बोलताना, “आपल्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल,”असे आश्वासन दिले.

गेल्या दोन वर्षांपासून ग्रामस्थांच्या समस्या तसेच तक्रारी प्रलंबित असून, यावल तालुक्याच्या विकासात गटविकास अधिकारी हे पद केवळ नावापुरते राहिले आहे, अशी भावना महिलांसह अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे चोपडा, रावेर व यावल तालुक्याचे आमदार यांनी देखील या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!