Homeक्राईमयावल शहर हादरलं! सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह शेजारीच्याच घरात; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

यावल शहर हादरलं! सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह शेजारीच्याच घरात; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

यावल दि 6 तालुका प्रतिनिधी  ( मिलिंद जंजाळे ) यावल शहरातून दोन दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह शेजारच्याच घरात सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या अमानुष व हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

मृत बालकाची ओळख

मृत मुलाचे नाव अब्दुल हन्नान मजित खान (वय ६, रा. बाबूजीपुरा, यावल) असे आहे. हा मुलगा एकुलता एक असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईने वडिलांना आपली किडनी दान करून जीवनदान दिल्याची हृदयस्पर्शी बाब उघडकीस आली आहे. या कुटुंबावर आता दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे.

मृतदेह शेजाऱ्याच्या घरातून

मुलगा हरविल्यानंतर घरच्यांनी व नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र शनिवारी सकाळी शेजाऱ्याच्या बिस्मिल्लाह खलिफा यांच्या घरातून मुलाचा मृतदेह सापडला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले.

पोलिसांचा तपास व नागरिकांचा संताप

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घर सील केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी संशयित आरोपीवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

शहरातील नागरिक संतप्त होत रस्त्यावर उतरले आहेत. “निष्पाप बालकाच्या हत्या प्रकरणी त्वरीत आरोपीला अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संघटना व स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

संघटनांचे निवेदन

या घटनेनंतर एकता संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते, मृत बालकाचे आजोबा तसेच मुस्लिम समाज कमिटीचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. हे निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक नखाते, फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर व यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांना देण्यात आले. यात आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

शहरात शोककळा

घटनेमुळे शांतताप्रिय यावल शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात हन्नानच्या अकाली मृत्यूबद्दल वेदना आणि संताप आहे. संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून वातावरण शोकमग्न झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!