यावल तालुका प्रतिनिधी दि . 20 ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यात आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले हे दोघं काकु पुतण्या एम पी, ०७ एन् पी, ३०७२ या दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात असताना, कृषी फलोत्पादन केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या एम एच १९ जे ७१९८ जे टी महाजन स्कूल बस यांची जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
कुशल डी एच जैन विद्यालयातील विद्यार्थी असून तो नुकताच ६०,% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला होता
अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकांचा ताबा सुटण्याची शक्यता असून, यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर घटना अपघाताचे वृत्त पसरताच गावातील राकेश महाजन, भाजपाचे कार्यकर्ते राकेश फेगडे , उमेश जावळे , विरावलि पोलिस पाटील यांच्या सह अनेक नागरिकांनी मदत कार्य केले, शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, एका वेळेसअंतिम संस्कार करण्यात आला नाही कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला
यांनी घटनास्थळी धाव घेऊनसंबंधित यावल पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे.





















