Homeताज्या बातम्यायावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या ग्रामीण भागातील भेटी फक्त कागदावर ......

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या ग्रामीण भागातील भेटी फक्त कागदावर … शासनाची दिशाभूल.. भाग – 5

यावल दि .24 तालुका प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या असतांना मात्र यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक्ष भेट दिलेल्या नसून फक्त कागदावर भेटी दाखविलेल्या दिसून येत असून अनेक भष्ट्राचाराला पाठीशी घातल्याचे दिसत असल्याने शासनाची दिशाभूल केल्याचे निर्दशनात येत आहे.

यावल पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधला जात असून यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी हि ग्रामीण भागातील विकास साधावा व ग्रामीण भागातील समस्या काय आहे,त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाच्या निर्दशनात आणून देऊन ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील समस्या सोडून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात साधण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी वेळो वेळो ग्रामीण भागातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या विभागाण मध्ये भेटी देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व ज्या ठिकाणी पंधरावित्त आयोग असेल,आरोग्याविषयक समस्या पशु विषय समस्या,शिक्षण विषयी समस्या,घरकुल योजना, रोजगार हमी योजना,बांधकाम विभागाअंतर्गत केल्या गेलेल्या कामाची पाहणी असेल,अश्या विविध विभागांची पाहणी आणि त्या विभागात करण्यात आलेला भ्रष्टाचार त्यावर वाचा फोडून कार्यवाही करण्याचे व शासनाच्या निर्दशनात आणून देण्याचे त्यातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे काम गट विकास अधिकारी यांची असते परंतु यावल तालुक्याचा विचार केला तर यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या हातून असे कोणते ही कामे झाले नसून उलट भष्ट्राचाराला कायम पाठीशी घालण्याचे काम केले असतांना दिसत आहे . यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना एकदा हि असे वाटले नाही की यावल तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष रित्या भेटी देऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणून घ्याव्या व नागरिकांशी संवाद साधावा व विकासात्मक दृष्टीकोनातून संपर्क साधावा.पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये करण्यात येणाऱ्या भष्ट्राचाराला आळा बसवावा असे केव्हा ही गटविकास अधिकार्यांना वाटले नाही का ? या उलट यावल गट विकास अधिकारी यांच्या यावल पंचायत समिती अंतर्गत विभागांमध्ये प्रतेक्ष भेटी तर नाहीच नाही मात्र भष्ट्राचाराला पाठीशी घालण्याचे काम मात्र यावल पंचायत गटविकास अधिकारी यांच्या कडून होतांना दिसून येत असल्याने यावल तालुक्तातील पंचायत समितीच्या अंतर्गत येणारे ग्रामीण भागात एकही भेटी प्रतेक्षरित्या दिल्या नसून मोठ्या प्रमाणात शासनाची दिशाभुल करण्याचे काम यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांच्याकडून होत असल्याने अनेक तक्रारी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या विषयी यावल तालुक्यात असून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदाची मोठी जबाबदारी असल्याने त्या पदाची गरिमा राखणे पंचायत समिती गट विकास अधिकारी वर्गाची असतांना मात्र यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कडून नागरिकांचे समाधान कारक कामे करण्यात आलेले नाही.किवा नागरिकांना गटविकास अधिकारी यांच्या कडून सन्मान पूर्वक मानसन्मान मिळत नाही.नागरीकांच्या समस्यांचे समाधान यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडून होतांना दिसून येत नसून नागरिकांशी वेगळ्या पणाची वागणूक देत स्वतःला मालक समजण्याचे व मालकाप्रमाणे भोंगळ कारभार करत नागरिकांना नोकर समजण्याचे काम या लोकसेवक यांच्या कडून होत असल्याचे दिसत असून यावल तालुक्याचा विकास अश्या भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकारी वर्गाकडून होत असून यावल तालुका विकासापासून खूप लांब असतांना पहावयास मिळत असल्याने यावल तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास न होण्याचे जबाबदार अश्या प्रकारचे अधिकारी असून वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी यावल तालुक्यातून सर्व सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!