यावल दि .18 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) पंचायत समिती, यावल येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या मौन सहमतीने एकच व्यक्ती दोन पदांवर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून जबाबदारी सांभाळत असून, त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालयातील (आरजीएसए) विभागात तालुका समन्वयक पदावरही कार्यरत आहे.
या दुहेरी पदामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कामे आणि तालुका पातळीवरील जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे कितपत योग्य आहे, याबाबत ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शासन नियमांनुसार एकाच व्यक्तीकडे दोन पदे असणे ही विसंगती मानली जात असुन असे अनेक प्रकारण यावल पंचायत समितीचे सोमोर येत असुन वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची चौकशी करून पारदर्शकतेने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
























