यावल दि . 7 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल पंचायत समितीतील कारभाराबाबत सतत नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी येत असूनही यावल पंचायत समितीला ISO प्रमाणपत्र मिळालं आहे, ही बाब संशयास्पद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि प्रश्न उपस्थित होत आहेत.
आमदारांचं रोष, पण परिणाम शून्य
यावल पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या तक्रार निवारण सभेत यावल-रावेर आणि चोपडा मतदारसंघातील आमदारांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर जोरदार नाराजी व्यक्त केली.
त्याच वेळी, नागरिकांकडून –घरकुल योजनेतील लुटरोजगार हमी योजनेतील अपप्रकार
असभ्य वर्तन कार्यालयात वेळेवर अनुपस्थिती तक्रार निवारणात हलगर्जीपणा यासारख्या गंभीर तक्रारी सादर झाल्या आहेत.
तक्रारी वाढत असताना ISO नामांकन?
दि. ८ जुलै रोजी यावल पंचायत समितीस ISO समितीने भेट देऊन ISO प्रमाणपत्र दिले. या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, “नागरिकांच्या तक्रारींचं गांभीर्य दुर्लक्षित करून ISO नामांकन दिलं गेलं का?”
“आलेली ISO समिती नेमकं काय पाहून गेली?”
असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
ISO प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कशासाठी दिलं जातं?
ISO (International Organization for Standardization) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारतात पंचायत समित्यांना कार्यक्षम, पारदर्शक, व दर्जेदार सेवा देत असल्याचे प्रमाण म्हणून हे प्रमाणपत्र दिलं जातं.
ISO निकष (मुख्य मुद्दे):
1. सेवा व्यवस्थापनाची गुणवत्ता – सेवा वेळेत आणि अचूक दिल्या जातात का?
2. दस्तऐवजीकरण – कामकाज नीट नोंदवले आहे का?
3. पारदर्शकता आणि जबाबदारी – निधी वापर, अंमलबजावणी खुलेपणाने होते का?
4. लोकसहभाग आणि समाधान – नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जातात का?
5. स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापन
6. तक्रार निवारण प्रणाली – वेळेत आणि योग्य प्रकारे निवारण?
समितीने प्रत्यक्षात हे निकष तपासले का?
या सर्व निकषांवर यावल पंचायत समिती खरी उतरते का?
– असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे, कारण:
तक्रारींचं प्रमाण जास्त असूनही त्यावर कारवाई न झाल्याच्या स्पष्ट नोंदी आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांविरोधात विशिष्ट आरोप, जसे की नागरिकांशी असभ्य वर्तन, लाभार्थींची फसवणूक, आणि कार्यालयीन गैरहजेरी यांची सत्यता तपासली गेली का?
नागरिकांचा आक्रोश: चौकशी करा!
ISO समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, नागरिक ISO समितीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
























