यावल दि . 25 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून नागरिकांना होत असभ्यतेची,अनके भष्ट्राचाराला खतपाणी घालत असल्याच्या मालिका लक्षवेध च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत असतांना ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण असून लक्षवेध च्या माध्यमातून प्रसिद्ध होत असलेल्या मालिकांमधून सत्य परिस्थिती माडली जात आहे.त्यामुळे यावल पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी च्या बेजाबदारी मुळे यावल तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याची चर्चा राजकीय पक्षातून व नागरीकांन मध्ये रंगू लागल्या आहेत.
यावल तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक समस्या असल्याने मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या अंतर्गत विभागांमध्ये अनके प्रकारे सुरु असलेल्या अनागोंदी कारभार सोमोर येतांना दिसत असतांना यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडून त्या अनागोंदी कारभाराला पाठीशी घातले जात असल्यामुळे यावल तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याने पंचायत समितीच्या अंतर्गत विभागांनमध्ये भष्ट्राचाराचा मोठा संचार बघायला मिळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागत असतांना यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीच सर्वस्वी जबाबदार आहे.अशी चर्चा आता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चांगल्याच रंगू लागल्या असून गट विकास अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या काय आहे ते सविस्तर पणे लक्षवेध च्या माध्यमातून माडण्याचा असून गट विकास अधिकारी (Block Development Officer – BDO) हे पंचायत समितीचे कार्यकारी अधिकारी आणि सचिव असतात. ते पंचायत समितीच्या योजना आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घेतात. तसेच, ते गट स्तरावर विविध विकास योजना आणि कार्यक्रमांचे व्यवस्थापन आणि देखरेख करतात.
गट विकास अधिकाऱ्यांची प्रमुख कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या:
• पंचायत समितीचे कामकाज:
गट विकास अधिकारी पंचायत समितीचे कामकाज पाहतात. पंचायत समितीच्या सभा आयोजित करणे, इतिवृत्त ठेवणे आणि समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश असतो.
• विकास योजनांची अंमलबजावणी:
केंद्र आणि राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी करणे, हे त्यांचे प्रमुख काम आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर ग्रामीण विकास योजनांचा समावेश असतो.
• ग्रामीण विकास:
ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी विविध योजना तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. यामध्ये गरीब आणि गरजू लोकांसाठी योजना, महिला आणि बालविकास योजना, तसेच इतर सामाजिक कल्याणकारी योजनांचा समावेश असतो.
• कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन:
पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे, त्यांना कामांचे वाटप करणे आणि त्यांच्या कामाचे योग्य पर्यवेक्षण करणे.
• वित्तीय व्यवस्थापन:
पंचायत समितीच्या निधीचे योग्य व्यवस्थापन करणे, तसेच शासनाकडून आलेला निधी योग्य कामांसाठी वापरणे.
• अहवाल सादर करणे:
पंचायत समितीच्या कामकाजाचा आणि योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल जिल्हा परिषद आणि शासनाला सादर करणे.
• समन्वय:
विविध शासकीय विभाग, गैर-सरकारी संस्था आणि इतर हितधारकांशी समन्वय साधून विकास कामांना गती देणे.
• आपत्कालीन व्यवस्थापन:
नैसर्गिक आपत्त्यांच्या काळात लोकांना मदत करणे आणि पुनर्वसन कामांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
• कायद्याचे पालन:
शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि कायद्यांचे पालन करणे.
थोडक्यात, गट विकास अधिकारी हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे दुवा आहेत आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.
कार्ये
1. पंचायत समितीची अधिकृत कागदपत्रे स्वतःच्या सहीने हस्तान्तरित करणे किंवा जतन करणे.
2. पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे
3. समितीच्या निर्णयांची अम्मलबजावणी करणे
4. पंचायत समितीच्या इतर अधिकाऱ्यांवर देखरेख व नियन्त्रण ठेवणे.
5. अंदाजपत्रक तयार करणे.
या प्रकारे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या असतांना यावल तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणे यावल गट विकास अधिकारी यांच्याकडून जबाबदारी पार पाडतांना दिसून आले नसल्याने यावल तालुक्यातील सुज्ञ नागरिकांसह अनेक राजकीय पक्षाचं कडून यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या विषयी नाराजीचा सूर उमटत असून यावल तालुक्यातील ग्रामीण भाग विकासात्मक दृष्ट्या मागेच आहे पाहिजे त्या प्रमाणात ग्रामीण भागातील विकास झालेला नसून अनेक योजनाचा बट्याबोळ झालेला दिसून येत असल्याने यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या बेजाबादारीनेच यावल तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास खुंटला असल्याच्या नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.
























