Homeताज्या बातम्यायावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दुर्क्षतेमुळे जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात... ...

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दुर्क्षतेमुळे जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात… ‘बाला ‘ प्रकल्पात भरली भ्रष्टाचाराची ‘शाळा’ ?बोलक्या भिंतींची लागली वाट ! भ्रष्टाचारारात अनेक अधिकारी यांचा हात असल्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा तर सुज्ञ पालकवर्गाकडून आरोप भाग – 4

यावल दि .23 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) प्राथमिक शाळेतील मुलांना ‘आनंददायी व बोलके ‘ शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाकडून यावल तालुक्यातील अनेक शाळांना चित्रमय करण्यासाठी ‘ बाला ‘ प्रकल्पासाठी लाखोच्या घरात निधी मंजूर झालेला होता.मोठ्या शाळांना जवळपास दोन लाख दहा हजार रुपयांचा निधी असताना अनेक शाळांमधील ‘ बोलक्या ‘भिंतींची या कामाची सर्वच शाळांमध्ये पूर्णपणे वाट लागलेली असल्याचे दिसून येत आहे.प्रत्यक्षात फक्त शाळा पाहून कमीत-कमी अथवा जेम-तेम वीसपंचविस-पन्नास हजारात रंग काम करणाऱ्या पेंटरां कडून काम करण्यात आलेले असून बाकीचा निधी कोणाच्या घशात गेला? हा गंभीर प्रश्न असून या कामात मोठा भ्रष्टाचार यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे झाला कि जाणून बुजून दुर्लक्ष करून भ्रष्टाचाराला पाठीशी घातले असे अनेक प्रश्न यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या विषयी उपस्थित होतांना दिसून येत असून या भ्रष्टाचारात पोसले जाणारे काही शिक्षण क्षेत्रातील अधिकारी बडे अधिकारी यांचे हात ‘काळे ‘ झाली असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.एकूणच या व्यापक भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन जे-जो दोषी आहे त्यांच्यावर कठोरात – कठोर कारवाई करण्याची गरज असून या शिक्षण क्षेत्रात आसतांना लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केले असल्याने शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे कृत्य केलेले आहे. अशी चर्चा सुज्ञ पालकवर्ग यांच्यात रंगली या कामांवर त्यांच्याकडून गंभीर आरोप केला जात आहे.

       याबाबत सविस्तर असे की,गेल्या काही मागील वर्षात जि.प./पं.स.प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शाळेतील लहान- लहान मुलांना ‘आनंददायी ‘ पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील सोडाच तर यावल तालुका भरातील अनेक शाळांना बाला प्रकल्प अंतर्गत काही प्राथमिक शाळांना दोन लाख दहा हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती.या मंजूर रकमेपैकी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने गावातील पालकवर्ग ,शिक्षणप्रेमी, गावातील पदाधिकारी यांच्याकडून अनेक पालक वर्गाची परिस्थिती नसतानाही सर्वच पालकांकडून तब्बल ९० हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करायची होती व ती वर्गणी शाळेच्या कम्बाईन खात्यात टाकल्यानंतर प्रशासनाकडून दोन लाख दहा हजार रुपये या कामासाठी शासन निधी टाकले जात होते.त्यानंतर एकूण तीन लाखात संबंधित शाळा बोलक्या करायच्या होत्या.मात्र या चांगल्या व सुंदर अशा व्यापक कामाला कोण्या ‘कपाळकरंट्या ‘ अधिकाऱ्यांची नजर लागली त्यामुळे अनेक शाळांमधील बोलक्या भिंती कामांची व रंगकामाची पूर्णपणे वाट लागलेली दिसून येत आहे.या कामांमध्ये शाळांना अंतरंग व बाह्य रंगाने आत-बाहेर असे संपूर्णपणे रंगकाम करायचे होते.

अबकड,abcd,पाढे,विज्ञानाचे चित्र,ऐतिहासिक चित्र,माझी दिनचर्या,बोलकी फळे,साप शिडी,दिशा व उपदिशा , शब्द तयार करणे,कार्टून चित्र,जलचक्र ,मानवी शरीराचे अवयव,घन भूमिती, भौमितिक आकार, म्हणी व सुविचार,ग्रहमाला , सूर्यग्रहण- चंद्रग्रहण,मोजपट्टी ,स्वच्छतेचे संदेश, छत्रपती शिवरायांचा रायगड किल्ला-प्रसंग ,देश ,राज्य जिल्हा व तालुका यांचे नकाशे,रंग ओळख व आकार ओळखा असे अनेक अनेक शैक्षणिक क्षेत्रातील मुद्द्यांवर चित्र काम करायचे होते.मात्र प्रत्यक्षात सर्वच शाळांमध्ये कामाची वाट लागलेली दिसून येत आहे. मनाला पटेल तसे पेन्टरलोक काम करून मोकळे झालेले आहे. यात काही शाळांची चित्रकामे पेंटरांनी अपुर्ण सोडून निघून गेलेले आहे.संबधित शाळां मधील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार काम करणारे पेंटर कोणाचेही ऐकत नव्हते.कसे-बसे काम करून त्यांना फक्त नावालाच काम करून द्यायचे होते.एकूणच याबाबत शाळांना भेटी दिल्या असता त्या – त्या शाळांमधील सर्वच वर्गांची व बाह्य अंगाची पाहणी करून शिक्षण क्षेत्रातील हे भ्रष्टाचाराचे भयान व काळीमा फासणारे वास्तव्य समोर आणले आहे.केंद्रप्रमुख,शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक कर्मचारी हे गरीब गायीप्रमाणे व कारवाईच्या भीतीने कोणतीही माहिती द्यायला पुढाकार घेत नाही उलट आम्ही कर्मचारी म्हणून पूर्णपणे हतबल झालेले आहे असे सांगत आहे.कोणालाच काही एक देणे घेणे नाही.जळते तर जळू द्या आपले काय जाते. अशी स्थिती असून कोणीही या भ्रष्टाचारी कामाविषयी कोणी वाचता करायला तयार नाही.फक्त संबंधित शाळांच्या प्रमुखांनी ठेकेदारांना ना- हरकत देऊन ‘ बाला ‘ प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले आहे.असे दाखवून संबंधित अधिकाऱ्यांकडून शाळेच्या खात्यातील मोठा निधी परस्पर वर्ग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सदर प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांचे ‘हात’ काळे- प्राथमिक शिक्षण क्षेत्र हे देशाची आदर्श व संस्कारी भावी पिढी घडवण्याचे मोठे साधन असून या शाळांमध्ये विशिष्ट कामांमध्ये असा गैरव्यवहार करणे म्हणजे काळीमा फासणे होय.या भ्रष्टाचारात काही हात काळे केले असल्याचे दबक्या स्वराचा चर्चा आहे.सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे गेल्या किमान अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न झाल्याने पदे जिल्हातील हे पदे रिक्त आहे. त्यामुळे आयती शिकार सापडल्याने काही शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांनी या कामांमध्ये चांगलीच ‘मलई ‘ खाल्लेली आहे. असेही सुज्ञ पालकांचे आरोप आहे.एकूणच हे संपूर्ण प्रकरणाची संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून जे-जे दोषी असतील त्या सर्वांवर कठोरात- कारवाईची गरज आहे. अशी मागणी सुज्ञ पालक वर्ग करीत आहे.दोन रुपयाचे काम जेम-तेम ५० पैसे अथवा २५ पैसे दराने केलेले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!