यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि 23 यावल येथिल पंचायत समिती सभागृहात चोपडा यावल आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व यावल रावेर मतदार संघांचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु सभेत पुरशी जागा उपलब्ध नसल्याने सभेत उपस्थित असलेले नागरिक व दोघ मतदार संघातील आमदारांनी नाराजी व्यक्त करून गटविकास अधिकारी यांचे काम असमाधान कारक असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरले.
यावल तालुक्यातील प्रथमच पंचायत समिती सभागृहात तक्रार निवारण सभेचे आयोजन दि 23 रोजी करण्यात आले होते.सभेत घरकुल पासुन वंचित लाभार्थी व रोजगार हमी योजने अंतर्गत गोटा व विविध योजनेचा आढावा घेतला गेला असता मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असल्याने व गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांचे दुर्लक्ष असल्यामुळे आमदार यांच्यासह मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी गटविकास अधिकारी यांच्या कामकाजा विषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करून कामकाज सुधारण्याची तंबी दिली. व काम काजत सुधारणा न झाल्यास ग्रामसेवक सह अधिकारी कर्मचारी यांच्यावर गय केली जाणार नसुन नागरिकांना सन्मान पूर्वक मानसन्मान दिला जाऊन नागरिकांना समाधान कारक उत्तरं देण अधिकारी व कर्मचारी वर्गाची जबाबदारी असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावल पंचायत समिती च्या कामकाजा विषयी नाराजी व्यक्त करीत सूचना दिल्या.यावेळी तक्रार निवारण सभेत चोपडा यावल मतदार संघांचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, यावल रावेर मतदार संघांचे आमदार अमोल जावळे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सोमवंशी, जिल्हा परिषद जळगांव येथिल सर्व वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सर्व ग्रामपंचायतिचे ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी,यावल तालुका आरोग्य अधिकारी राजु तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, यांच्या सह कर्मचारी, शिक्षण विभागतील अधिकारी कर्मचारी, महिलाबाल विकास अधिकारी अर्चना अटोळे यांच्यासह यावल तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी दोघ आमदार यांचे समर्थक कार्यकर्ते, व यावल तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























