यावल दि .18 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) रावेर तालुक्यातील अलहसनात उर्दू हायस्कूल रसलपूरचे मुख्याध्यापक शकील खान पठाण सर यांची नुकतीच मुख्याध्यापक संघ रावेर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल साकळी येथिल लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. साबीर खान (अध्यक्ष, हज्जन कुलसुम बी. उर्दू हायस्कूल भालोद), मोहसीन खान आसिफ खान (अध्यक्ष, सर सय्यद प्रायमरी स्कूल यावल), हाजी निसार खान (चेअरमन, अंजुमन-ए-इस्लाम उर्दू हायस्कूल साकळी), असगर शेख हाजी हुसेन, अबरार सर (साकळी), अकबर मेम्बर, फाखरोद्दिन कुरेशी (उपसरपंच, साकळी), अयाज खान हाजी निसार खान (समाजसेवक), सलीम मन्यार (मेंबर), साजिद बेग सर (पत्रकार, उर्दू टाइम्स), रऊफ मिस्त्री (हिंगोणा), खतीब तडवी (मेंबर, साकळी), अतीक खान सर (साकळी), असलम हाजी हुसेन (साकळी), नूर खान पहलवान (साकळी), इक्रामोद्दीन मिस्त्री, अलाउद्दिन मिस्त्री, अफसर सर (डिजिटल हब ऑनर), तसेच पिंटू दादा यांची उपस्थिती होती .
सत्कार समारंभात मान्यवरांनी शकील खान पठाण यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना आगामी काळात शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
























