जळगाव दि . 17 (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सुधारणा आणण्यासाठी राबविलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे”चा जल्लोषासह यशस्वी समारोप करण्यात आला . ही मोहिम राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरांवर एकूण १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली असून, त्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक सरकारी विभागांना गौरवण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेमध्ये नाशिक विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी गटाकडून वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव नितिन बोरकर यांचे कार्यालय द्वितीय क्रमांकावर निवडले गेले त्यांच्या कामगिरीची प्रसंशा करून शासनाने त्यांना “प्रशस्तीपत्र” देऊन गौरवले आहे. या गौरवाचे पत्र त्यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देवून सम्मान केले .
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेतील यश
महाराष्ट्र शासनाची ही १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम प्रशासन व्यवस्थापनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जलद सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुका विभाग, जिल्हा कार्यालय, तसेच राज्यस्तरीय कार्यालये यांमध्ये सुधारणा करण्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
नाशिक विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी, जळगाव यांच्या उत्कृष्ट कार्याचा विशेष उल्लेख करण्यासारखा आहे. मोहिमेअंतर्गत त्यांनी आपल्या कार्यालयात अधिक कार्यक्षम नोंदी राखणे, दैनंदिन कामांची गती वाढवणे तसेच सार्वजनिक सेवा जलद व पारदर्शकपणे पुरवण्यावर भर दिला. या प्रयत्नांना शासनाने मान्यता देत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उप मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्रक प्रदान केले.
प्रशस्तीपत्राचा महत्त्व
प्रशस्तीपत्र हा सरकारी कर्मचारी किंवा संघटनांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा गौरव आहे, जे त्यांना पुढील कामगिरीसाठी प्रेरित करतो. नितिन अशोक बोरकर यांना मिळालेले हे प्रशस्तीपत्र त्यांच्या समर्पित कार्याचे, मेहनतीचे व नेतृत्व गुणांचे प्रतिक आहे.
त्यांच्या चमूच्या मेहनतीमुळे वन क्षेत्रातील कामकाज अधिक प्रभावी झाली असून, शासकीय धोरणांची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे”ने राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. नाशिक विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी नितिन अशोक बोरकर यांचा या मोहिमेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून राज्याला अभिमानास्पद यश दिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शासनाकडून प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, जो त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला उत्साह देणारा ठरला.
अशा प्रकारच्या सुधारणा मोहिमांमुळे शासनाची कामे अधिक सक्षम, पारदर्शक आणि जनहितासाठी उपयुक्त ठरत आहेत, जे महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
























