यावल (प्रतिनिधी ) दि .24 जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 2024 मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमितते विरोधात जिल्ह्याच्यावतीने अमळनेर प्रांतधिकारी कार्यालयावर भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला .
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या.काँग्रेस चे नेते .राहुल गांधी सतत भारतीय निवडणूक आयोगाला या निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न विचारत आहेत. परंतु, निवडणूक आयोग स्वतः या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी, भाजपचे काही वरिष्ठ नेते निवडणूक प्रक्रियेतील गलिच्छ कारभार झाकण्याचे काम करत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकांच्या प्रामाणिकतेबाबत वक्तव्ये करत असल्याचे चित्र आहे.
२०२४ च्या मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांपासून ते नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान केवळ ५ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील मतदारसंख्येत तब्बल ४१ लाखांनी वाढ झाली आहे, जी आकडेवारी आणि बनावट मतदानाच्या प्रकारांबाबत मोठ्या शंका उपस्थित होतात .

या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निवडणूक प्रक्रियेत भाजपकडून झालेल्या हस्तक्षेप आणि संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या दबावाविरोधात तसेच निवडणुकीच्या गलिच्छ कारभाराविरोधात जोरदार मशाल मोर्चा काढण्यात आला. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना – उद्धव ठाकरे गट,अमळनेर तालुका यांचा विशेष पाठिंबा या आंदोलनाला लाभला यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार,रावेर- यावल तालुक्याचे माजी आमदार शिरीष दादा चौधरी,क्राँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदिप पाटील,अमळनेर माजी आमदार बि.एस.पाटील,अमळनेर तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी,अमळनेर शहरअध्यक्ष मनोज पाटील,इंटक अध्यक्ष दत्तात्रेय पाटील,माहिला अध्यक्ष सुलोचना वाघ,सेवा दल अध्यक्ष संजु पाटील,आदिवासी कांग्रेस अध्यक्ष संजु जमादार,महाराष्ट्र काँग्रेस अ.नू.जाती सचिव राजू सवर्णे,ज्ञानेश्वर कोळी,मा.जमील शेख,रावेर तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील यावल तालुकाध्यक्ष शेखर पाटील,रावेर माजी नगराध्यक्ष हरीशशेठ गनवाणी,एन.एस.यु.आय जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव,आशुतोष पवार,यावल शहरध्यक्ष मो.हकीम मो. याकुब,अनिल जंजाळे,सोशल मिडिया प्रमुख अभय महाजन,चितोडा सरपंच अरुण पाटील,उपसरपंच गोलु धांडे,लियाकत जमादार,उपसरपंच मजित तडवी,
असलम तडवी,बशीर तडवी,.राहुल पाटील,यशवंत धनके,रामदास लहासे,मारुळ सामजिक कार्यकर्ते जावेद जनाब,मसरूल अली गव्हर्नर,मतीउर रहमान दहीगाव सरपंच अजय अडकमोल,सुनील पाटील शरद राजपूत,मा.अताउल्ला खां सैफुल्ला खां,उमर अली मोहम्मद कच्छी, शमसुद्दीन सुलतान खान,शेख निसार मोमिन,मा.रफिक मो. हनीफ टेलर,शरीफउद्दीन सिराजुद्दीन,प्रसन्ना महाजन, विकास पाटील,महेंद्र धांडे,रमेश पाटील,किरण पाटील व जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
























