Homeताज्या बातम्यामध्यप्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – आमदार अमोलभाऊ जावळे यांची विधिमंडळात...

मध्यप्रदेशच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – आमदार अमोलभाऊ जावळे यांची विधिमंडळात मागणी

रावेर ( प्रतिनिधी ) दि .14 महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी अतिवृष्टी व वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीसंदर्भात अतिशय महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडला. सध्या महाराष्ट्रात शेती नुकसान भरपाई मिळण्यासाठी साधारण वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते, तर मध्यप्रदेशमध्ये अवघ्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अर्धी नुकसानभरपाई जमा केली जाते.

महाराष्ट्रातही नुकसान नोंदणी प्रक्रियेत गती येऊन तातडीने मध्यप्रदेशच्या धर्तीवर भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार जावळे यांनी अधिवेशनात केली.

त्याचप्रमाणे, रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काही गावांमध्ये मागील महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत, ही बाबही त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिली. शेतकरी 15 दिवसांपासून प्रतिक्षेत असून, त्यांना पुढील पेरणीचे नियोजन करायचे असल्याने पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

29 जून रोजी चिनावल, उटखेडा, रसलपूर या भागांमध्ये जिओ टॅगिंग व व्हेरिफिकेशन प्रक्रियेची अंमलबजावणीही वेळेवर झालेली नाही, याकडेही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

“शेतकरी संकटात असताना त्यांना वेळेवर मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, त्यामुळे पंचनामे व नुकसानभरपाई प्रक्रियेला अधिक गतिमान करावे,” अशी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी ठाम भूमिका मांडली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!