Homeताज्या बातम्याभूमिपुत्रांचा गौरव : शेतकरी नेते रविकांत तुपकर 18 जानेवारीला रावेरला : कृषिसेवक...

भूमिपुत्रांचा गौरव : शेतकरी नेते रविकांत तुपकर 18 जानेवारीला रावेरला : कृषिसेवक पुरस्काराने शेतकरी बांधवांचा होणार सन्मान  रावेरला ८ वा कृषिसेवक पुरस्कार सोहळा 

रावेर दि .10 ( प्रतिनिधी ) साप्ताहिक कृषिसेवकच्या वर्धापन दिनानिमित्त 18 जानेवारीला रावेरला 8 वा राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते भूमिपुत्रांचा गौरव करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा कै श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात सकाळी 10:30 वाजता संपन्न होत आहे. 

पुरस्कार सोहळ्याचे आयोजन साप्ताहिक कृषिसेवकतर्फे करण्यात आले असून जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव, महालक्ष्मी बायोजिनिक्स चिनावल, गोदावरी फाउंडेशन जळगाव, माऊली फाउंडेशन व भारती ज्वेलर्स रावेर हे प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते संपन्न होईल. पुरस्कार वितरण शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पुरस्कारार्थीच्या कार्याचा आढावा व परिचय असलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन डॉ. उल्हास पाटील माजी खासदार जळगाव व शिरीष चौधरी माजी आमदार रावेर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृष्णात महामुलकर (जनरल मॅनेजर, नेटाफिम इरिगेशन), प्रदीप कोठावदे (एम डी ऍग्री सर्च उद्योग समूह), कुर्बान तडवी( जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव),विनोद तराळ (अध्यक्ष माफदा संघटना पुणे ), के बी पाटील (उपाध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव), अनिल भोकरे (माजी सहसंचालक कृषी विभाग), सुरेश धनके (प्रदेश सरचिटणीस भाजपा), जे के पाटील (माजी अध्यक्ष मुख्याध्यापक महामंडळ), रंजना पाटील (माजी अध्यक्ष जि प जळगाव), संगीता महाजन (नगराध्यक्ष रावेर), नंदकिशोर महाजन( रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख),प्रल्हाद पाटील (सभापती कृ उ बा समिती), डॉ प्रशांत सरोदे (संचालक महालक्ष्मी बायोजिनिक्स), श्रीराम पाटील (उद्योजक जळगाव), योगीराज पाटील (जिल्हाप्रमुख शिवसेना), राहुल पंडीत (अध्यक्ष मराठा समाज विकास मंडळ), डॉ संदीप पाटील (अध्यक्ष माऊली फाउंडेशन रावेर), पद्माकर महाजन (माजी नगराध्यक्ष रावेर), भारती गणवानी (संचालिका भारती ज्वेलर्स रावेर), विशाल जयस्वाल (पोलीस निरीक्षक रावेर ), भाऊसाहेब वाळके (तालुका कृषी अधिकारी रावेर ), सोपान पाटील (जिल्हाध्यक्ष ड्रीप असोसिएशन जळगाव), महेश महाजन (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र पाल), राहुल पाटील (अध्यक्ष रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशन),युगंधर पवार (उद्योजक फैजपूर), सी एस पाटील (अध्यक्ष जळगाव फार्मर प्रो. कंपनी)यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!