Homeक्राईमभुसावळच्या तरुणाचा फैजपूरमध्ये विहिरीत पडून मृत्यू

भुसावळच्या तरुणाचा फैजपूरमध्ये विहिरीत पडून मृत्यू

फैजपूर दि . 30 प्रतिनिधी (आदित्य गजरे) यावल तालुक्यातील फैजपुर येथील मिल्लत नगर परिसरात गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट २०२५) दुपारी झालेल्या एका दुर्दैवी घटनेत भुसावळ येथील २९ वर्षीय तरुणाचा उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाला. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृत तरुणाचे नाव मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलु (वय २९, रा. भुसावळ) असे असून, तो कामानिमित्त फैजपूर येथे आला असताना ही दुर्घटना घडली. दुपारी सुमारास तो मिल्लत नगर परिसरात चुकून रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत पडला. पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलविण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच उघड्या व असुरक्षित विहिरींवर तातडीने संरक्षक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!