रावेर दि .12 प्रतिनिधी ( विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहमांडली – बोरमळी पाडा येथील आदिवासी महिला यांनी विविध समस्या बाबत रावेर तहसील येथे आर पी आय यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून मा. तहसीलदार /गटविकास अधिकारी यांना निवेदन देत आक्रोश व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे की _बोरमळी,येथील पाड्यावरील नागरिक हे शेतमजुरी करून जसे आपले पोट भरत आहे व आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे तसेच गेल्या अनेक वर्षं येथे राहत असून पिढ्या न पिढ्या यांच्या गावामध्ये गेल्या असता अजूनही त्यांच्या नावे जागा करून देण्यात आल्या नाहीत. व काहींना घरकुल योजना देण्यात आली नाही.
त्याचबरोबर सदर गावामध्ये पिण्याच्या पाणी सुद्धा सोय उपलब्ध नाही. गावामध्ये एक हापसी असून ती देखील बंद अवस्थेत होती.येथील नागरिकांनी स्वखर्चाने मोटर आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
परंतु मोहमंडली ग्रामपंचायतची गावातील मोटर खराब झाली असता पाड्यावरील मोटार काढून मोहमांडली गाव मध्ये नेऊन बसण्यात आली.संबंधित सरपंच यांच्या घरी जाऊन नागरिक प्रश्न विचारू लागले की आम्ही आमच्या खाजगी स्व:खर्चातून आणलेली मोटार तुम्ही का घेऊन आलात.? या संदर्भात सरपंच यांचा मुलगा याने ताकीत दिली की माझ्या घरी कोणीही यायचे नाही. काय करायचे ते करा असे उत्तर देऊ ग्रामस्थांना तेथुन हाकलून लावले.
ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांनी संगनमत करून पाड्यातील नागरिकांना नाहक त्रास देत असल्याचे स्थानिकांचा आरोप आहे.
यामुळे पाड्यावरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सदरील गावामध्ये अजूनही अंगणवाडी नाही, आशा सेविका येत नाही, त्यांच्या मूलभूत सुविधांकडे कोणीही लक्ष देत नाही.
तसेच रेशन दुकानदार मनमानी कारभार करत असून त्यांना पुरेसे धान्य देत नाही.नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
भारत स्वतंत्र होऊन 78 वर्षी झालेली असताना देखील अजून ही आदिवासी बोरमाळी पाड्यावरील नागरिक हक्कचे पक्के घर,रेशन,पाणी, अश्या मूलभूत सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे.तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित नागरिकांना हक्काचे घर,रेशन व पाणी या मूलभूत सुविधांवर लक्ष द्यावे व त्यांच्या समस्या मार्गी लावाव्या अशी मागणी आर पी आय चे तालुका अध्यक्ष विष्णू पारधे व बोरमाळी पाडा येथील नागरिकांना निवेदन प्रसंगी मत व्यक्त केले.
























