Homeक्राईमबालकावर लैंगिक अत्याचारानंतर निर्घृण खून – आरोपी पोलीस कोठडीत, पोस्को कलमाची वाढ

बालकावर लैंगिक अत्याचारानंतर निर्घृण खून – आरोपी पोलीस कोठडीत, पोस्को कलमाची वाढ

यावल दि .10 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल शहरात घडलेल्या सहा वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात आता धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बालकाची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले असून, या गुन्ह्यात आता पोस्को कलमाची वाढ करण्यात आली आहे.

दि. 5 सप्टेंबर रोजी बाबुजीपुरा भागातील सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. ईद-ए-मिलादच्या सणादिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. दुसऱ्याच दिवशी, दि. 6 सप्टेंबर रोजी, बालकाचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या संशयित शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय 22) यांच्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळून आला.

मयताच्या आजोबांच्या फिर्यादीवरून सुरुवातीला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान आरोपीने कोठडीत चौकशीदरम्यान धक्कादायक कबुली दिली असून, बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी आरोपी शाहिदला न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, चौकशीदरम्यान तो “पोपटासारखा” कबुलीजबाब देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख हे करीत आहेत. परिसरात अजून कोणी आरोपींचा सहभाग आहे का, याकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

या निर्घृण हत्येमुळे यावल शहरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी या प्रकरणात गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!