Homeताज्या बातम्याबारामतीत भीषण अपघात – बाप आणि दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू खंडोबानगर...

बारामतीत भीषण अपघात – बाप आणि दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू खंडोबानगर वळणावर हायवाने मोटार सायकलला धडक दिली; निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल

बारामती दि . 27 प्रतिनिधी ( विश्वजा कदम ) खंडोबानगर, बारामती येथे रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरून जात असलेल्या वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या टाटा कंपनीच्या हायवा ट्रकने वळणावर मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांची नावे:

 1 )ओंकार राजेंद्र आचार्य (वय 37) 2 ) सई ओंकार आचार्य (वय 10)3 ) मधुरा ओंकार आचार्य (वय 4) (सर्व रा. मॅजिक ग्रीनसिटी, खंडोबानगर, बारामती)

घटनेचा तपशील:

मिळालेल्या माहितीनुसार, मयत ओंकार आचार्य हे आपल्या दोन मुलींना मोटारसायकलवरून घेवून घरी येत असताना, महात्मा फुले चौकाजवळील वळणावरून जात होते. याच दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या हायवा ट्रक (MH 16 CA 0212) ने त्यांना मागून धडक दिली.

हायवा चालक दशरथ दत्तात्रय डोळे (वय 50, रा. भिलारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे ट्रक चालविला, अशी तक्रार फिर्यादी अमोल आचार्य यांनी दिली आहे.

पोलीस कारवाई:

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. 263/2025 अन्वये BNS कलम 281, 106(1), 125(a)(b), 324(4) आणि मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 • दाखल अंमलदार: म.पो.ह.वा. धुमाळ

 • तपास अधिकारी: पो.उप.नि. अनिल सातपुते

स्थानिक संतप्त:

अपघाताच्या पार्श्वभूमीवर खंडोबानगर परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून, चौकातील वळणावर योग्य वाहतूक नियोजन नसल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याची तक्रार त्यांनी केली.

तातडीने स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही आणि ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!