Homeताज्या बातम्याबातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांस असभ्य वागणूक..गटविकास अधिकारी यावल यांचा प्रताप..

बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांस असभ्य वागणूक..गटविकास अधिकारी यावल यांचा प्रताप..

यावल प्रतिनिधी  दि.18 ( मिलिंद जंजाळे ) यावल येथिल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कडे आय.एस.ओ.नामांकन बातमी संकलनासाठी गेल्या पत्रकारास उडवा उडवीची उत्तरे देत मा गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांनी अरेरावी करत उर्मट भाषेचा वापर केला.

सविस्तर वृत्त असे की _यावल पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या गट विकास अधिकारी यांची यावल पंचायत समिती सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत यावल रावेर मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व यावल चोपडा मतदार संघाचे आमदार प्रा.चंद्रकात बळीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 23 जुन २०२५ रोजी तक्रार निवारण सभा घेण्यात आली होती..त्यात दोघ मतदार संघाचे आमदार व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी यावल गटविकास अधिकारी यांचे असमाधान कारक काम असल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती . तसेच तालुक्यातील नागरिक कामानिमित भेटण्यास गेले असता नागरिकांना उर्मट भाषेचा वापर व नागरिकांना भेटत नसल्याच्या तक्रारी तक्रार निवारण सभेत नागरिकांनकडून करण्यात आल्या होत्या.
त्यासंदर्भात तालुक्यातील विविध माध्यमांच्या पत्रकारांनी सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी व दोघ मतदार संघाचे आमदार यांकडे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती गायकवाड यांची तक्रार केली होती.त्या विषयासंबंधी चां राग मनात धरून त्यांनी लक्षवेध न्यूज चे पत्रकार आय एस ओ.नामांकन बातमी संकलनासाठी गेले असता गट विकास अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी अरेरावी करत माझ्या विरुद्ध तुम्ही पत्रकार लोक वरिष्ठ अधिकारी,व आमदार यांच्या कडे माझी तक्रार करतात आणि माझ्या विरुद्ध बातम्या लावतात व तालुक्यातील पत्रकारांची लायकी नाही.
त्यामुळे तुम्ही पत्रकार नाही आले आणि आम्हाला प्रसिद्धी नाही दिली. तरी चालेल आम्हाला असे पत्रकार चालत नाही. तुम्हाला माझ्या विरोधात ज्या बातम्या छापायच्या असतील त्या छापा मी कोणालाही घाबरत नाही.कारण आता पर्यंत माझ्या विरोधात अनेक राजकीय लोकांनी उपोषण केले तेव्हा तर मी घाबरले नाही, अश्या उर्मट भाषेत व अरेरावी करत बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकार यांना गटविकास अधिकारी श्रीमती गायकवाड यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली.
तर प्रश्न पडतो तालुक्यातील ग्रामीण भागातील सामन्य नागरिक जेव्हा काही आपली समस्या घेऊन मांडण्यासाठी येतं असतील तर यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ह्या कशी वागणूक देत असतील मोठा प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे?
त्याचबरोबर मोठ्या प्रमाणत भोंगळ कारभार सध्या पंचायत समितीत चालत असून वरिष्ट अधिकारी वर्ग का याकडे दुर्लक्ष करीत आहे.
असे उर्मट पणे वागणूक देणारे अधिकारी जर यावल तालुक्यात असतील तर तालुक्याचा विकास कसा होणार हि मोठी चिंता जनक बाब असून मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व मतदार संघाचे आमदार यांनी लक्ष देण्याची मोठी गरज असल्याचे सामान्य नागरिकांनकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!