बुलढाना दि . 21 (प्रतिनिधी ) बुलढाना जिल्हयासह राज्यभरातील भूमिहीनांच्या भुमिहक्क व सामाजिक न्याय हक्कासाठी भुमि मुक्ति मोर्चा बहुजन मुक्ति मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे नेतृत्वात पदाधिकारी ३० वर्षापासून शासन प्रशासन विरुद्ध मुख्यमंत्री महसूल व वन मंत्रालय पर्यंत बहुजन भूमिहीनाच्या भूमि हक्क,व सामाजिक न्याया साठी सातत्याने लढत आहेत व संघटनेचे लढ्यामुळ जिल्ह्यातील भूमिहीनांना 1993 ते 2025 पर्यन्त हजारोना महसूल व वन जमीन पट्टे मिळवून दिलेत. परंतु तत्कालीन काळातील अपात्र ठरलेल्या हजारो ना पट्टे वाटप बाबत पुनर्वीचार 2010 मुंबई उच्च न्यायालय निर्णयांची राज्य व जिल्हा महसूल व वन विभाग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे अकार्यक्षम जातीय वृत्तीमुळं अंमलबजावणी न झाल्याने महसूल जमीनअतिक्रमण धारक भूमी हक्क पासून वंचित राहिला.आणि 2011 मा.सर्वोच्च न्यायालयनिर्णय मुळे राज्य शासन निर्णय 2011नुसार 1990 पूर्वीचे अपात्र ठरविलेल्या ना पात्र बहुजन मागासवर्गीय ओबीसी आदिवासी व पारधी समाज अतिक्रमणधारकांच्या वन महसूल जमीन पट्टे लढा त्यांचे अतिक्रमण जमीन पिक पेरणी सह पिकांना संरक्षण कायदेशीर मदत कार्य संघटना करत आहे परंतु गत काही काळात जिल्ह्यातील काही चळवळीतील व काही राजकीय पक्ष नेत्यांकडून भूमी मुक्ती मोर्चा संघटना संपविण्याची सुपारी घेतले ल्या काही सुपारीबाज कथित युवांच्या तथाकथित संघटनांनी अतिक्रमणधारकांचे लाखोचे आर्थिक शोषण,भूमिहीनांची दिशाभूल केल्याने जिल्ह्या त अतिक्रमणधारकांचे न्याय हक्कासाठी 30 वर्षा पूर्वी पासून सातत्या ने लढा देणाऱ्या भूमि मुक्ती मोर्चा आंदोलन तोड़ण्याचा प्रयत्न केला आणि आज शासन निर्णय नुसार राजकीय दबावाखाली प्रशासनाकडून जिल्ह्यातील भूमिहीनाचा वन महसूल जमीन पट्टे प्रश्न गंभीर व जटील झाल्याने आता जिल्ह्यातील बहुजन अतिक्रमणधारकानी विचार करणे गरजेचे आहे.भूमी मुक्ती संघटनेचा अतिक्रमण धारकांसाठी लढा शासन ते प्रशासनस्तर सुरु आहे. शासन प्रशासनाने वन महसूल अतिक्रमण धारक भूमिहीनां च्या प्रत्येक तालुक्यातील वन महसूल जमीनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सदर जमिनी विकासाच्या नावा खाली भूमिहीन अतिक्रमकां च्या ताब्यातून हिसकावून घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प च्या खाजगी कंपन्या व शासकीय रुग्णालये खेळाचे मैदान सारख्या प्रकल्पा ना देण्या चा संकल्प केला असून,बहुजन भूमिहीन,व शेतकऱ्यांच्या संभाव्य अन्याय भूमिहक्क, व सामाजिक न्यायाचा बहुजन भूमिहीनाचे कृषी, निवासी स्मशान भूमी भूमिहक्क व पट्टे ,शेतकरी व भूमिहीन 100%कर्ज मुक्ती व अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी व भूमीहीनां ना आर्थिक मदत,व वन महसूल प्रलंबित दावे पात्र अपात्र ता निश्चिती आणि राज्यशासन व तालुक्यासह जिल्हा वन,महसूल,तहसील, व प.स. विभाग कडील प्रलंबित अन्य मागण्यासाठी संघटनेचे संस्थापक भाई प्रदीप अंभोरे यांचे प्रमुख मार्गदर्शनात मधुकर मिसाळ दीपक कस्तुरे अनिस पठाण ज्ञानदेव मिसाळ यांचे नेतृत्वा त भाई बाबुराव सरदार प्रवक्ता भाई भिमराव खरात प्रदेश नेते प्रभाकर वाकोडे रमेश गाडेकर अशोक वानखेडे सारांगधर वाकोडे भगवान गवई गजानन जाधव राजेंद्र सुरडकर बि एस जाधव भरत मुंडे आदी जिल्हा नेते यांचे उपस्तितीत चिखली तहसील कार्यालयवरील भूमि मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा चिखली च्या वतीने बुधवार दि. 24/09/2025 रोजी बहुजन संग्राम सत्याग्रह आ आंदोलनास चिखली तालुक्यातील बहुजन शेतकरी भूमिहीन अन्यायग्रस्त अतिक्रमण धारक सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन भास्कर भाई सुधाकर लव्हाळे गौतम खरात दीपक हिवाळे मंगेश गवई अरुण चव्हाण सुरेश जाधव मेहबूब भाई लुकमान भाई रमेश बोरकर महेंद्र गवई आदी तालुका नेते यांनी प्रसिद्धी पत्राद्वारा केली आहे .
























