यावल दि. 21 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) फैजपूर येथील अमित शशिकांत सरोदे (उर्फ गोलू, वय ३७ वर्षे) हे दि. ०८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अंदाजे ८.३० वाजता घरातून बाहेर पडले असून ते परत घरी न आल्यामुळे ते हरवले असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बेपत्ता झाल्याची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हरवलेल्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक ९१८६००१२१०२१ असा आहे. त्यांचा उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून वय ३७ वर्षे आहे.
कोणाला त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा फैजपूर पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
























