Homeशिक्षण-प्रशिक्षणफैजपूरमध्ये अत्याधुनिक अभ्यासिका उभारणीसाठी ५२ लाखांचा निधी — आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या...

फैजपूरमध्ये अत्याधुनिक अभ्यासिका उभारणीसाठी ५२ लाखांचा निधी — आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

रावेर दि . 18 ( प्रतिनिधी ) नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदान योजनेतून फैजपूर नगरपरिषदेला ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या साहाय्याने अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेली नवी अभ्यासिका उभारली जाणार आहे.

फैजपूर शहरात उच्च दर्जाची व शांत वातावरणातील अभ्यासिकेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना योग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत शासनाने हा निधी मंजूर केला आहे.

आमदार अमोलभाऊ जावळे यांना शिक्षण क्षेत्राशी विशेष जिव्हाळा असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ही त्यांची सातत्यपूर्ण भूमिका आहे. नव्याने उभारल्या जाणाऱ्या या अभ्यासिकेमुळे फैजपूर व परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणादायी व सुसज्ज वातावरण लाभणार आहे.

या मंजुरीमुळे शहरात समाधानाचे वातावरण असून, नागरिक व विद्यार्थी वर्गाने आमदार जावळे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ही अभ्यासिका लवकरच अत्याधुनिक सुविधांसह ज्ञानकेंद्र म्हणून कार्यरत होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!