Homeक्राईमफेमस होण्यासाठी फूटपाथवर जीवघेणा स्टंट ! सोशल मीडियासाठी स्टंट करणाऱ्या युवकावर वाहतूक...

फेमस होण्यासाठी फूटपाथवर जीवघेणा स्टंट ! सोशल मीडियासाठी स्टंट करणाऱ्या युवकावर वाहतूक पोलिसांची कारवाई, कोर्टात खटला दाखल

बारामती दि.३० (प्रतिनिधी ) सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी थरारक स्टंट करत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक शाखेने कठोर कारवाई केली आहे. फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत रील तयार करणाऱ्या या युवकावर दंड ठोठावण्यात आला असून त्याच्यावर कोर्टात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

दि. २५ जुलै रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक युवक (दुचाकी क्रमांक MH42 BP 0090) फूटपाथवरून वेगाने दुचाकी चालवत होता. त्याच्या या स्टंटमुळे रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे प्राण धोक्यात आले होते. व्हिडिओची गंभीर दखल घेत बारामती वाहतूक पोलिसांनी संबंधित युवकाचा मार्ग काढत त्याची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटवली.

वाहतूक पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून, मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार नोटीस बजावून पोलिस ठाण्यात कारवाई करण्यात आली. याआधीही संबंधित दुचाकीवर नो पार्किंगचा जुना दंड प्रलंबित होता, तोही वसूल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली जवान प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण यांनी ही कार्यवाही केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप शेखिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वाहतूक विभागाचा इशारा: फूटपाथचा वापर फक्त पादचाऱ्यांसाठीच !

शहरातील वाढत्या वाहतूक गोंधळात फूटपाथचा वापर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वाट तयार करण्यासाठी आहे, स्टंटसाठी नव्हे. यापुढे असे रीलबाज स्टंट करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिस निरीक्षक यादव यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!