रावेर (प्रतिनिधी ) दि .14 पालच्या हरीण पैदास केंद्रांबाबत चिंतेची बातमी समोर आली आहे. हरीणांची संख्या फारच घटली असून, पैदास केंद्रात आता फक्त 6 हरीण उरले आहेत. या नाजूक परिस्थितीत, नवीन हरीणांची उत्पत्ती होत नसल्याने केंद्राच्या अस्तित्वावर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
हरीण पैदास केंद्रांतील हरीणांच्या संख्येत कमालीची घट
पालीच्या हरीण पैदास केंद्रामध्ये हरीणांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे निसर्गप्रेमीं मध्ये मोठा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र, प्रशासनाकडून दिलेली कारणे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठा तफावत असल्याचा आरोप ही होत आहे.
हरीणांच्या नामशेष होण्याची खरी कारणे काय ?
प्रशासनाने वारंवार म्हटले आहे की, हरीणांच्या टक्करांमुळे त्यांचा मृत्यू होतो. मात्र, स्थानिक निसर्गप्रेमी आणि तज्ज्ञ यांचा असा दावा आहे की, मुख्य कारण वेळेवर आणि पुरेसे चारा उपलब्ध न होणे आहे. हरीणांच्या नैसर्गिक चाऱ्याची टंचाई आणि पैदास केंद्रात चारा व्यवस्थापनात होणारी दिरंगाई या कारणांमुळेच हरीणांच्या जन्मदरात घट होत असून मृत्यू वाढला आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संकटांची वाढ
पाल वन्यजिव प्रशासनाकडून हरीणांच्या उत्पतीसाठी घेतलेल्या उपाय योजनांचा अभाव दिसून येतो. चारा योग्य न होणे, पाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि संरक्षित परिसरातील देखरेखीची कमतरता यामुळे ही हरीणं संकटात आहेत. हरीण पैदास केंद्र आता केवळ नावापुरते अस्तित्वात आहे पण खरा अर्थाने ते नामशेष होत आहे.
निसर्गप्रेमीं व पर्यटकांना निर्माण होत आहे शंका
प्रशासनाची कामगिरी पाहून निसर्गप्रेमींना पैदास केंद्राच्या भविष्याची शंका निर्माण झाली आहे. पैदास केंद्राच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सुधारणा न झाल्यास पालचे हरीणं पैदास केंद्र पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते यात शंका नाही
पालचे हरीण पैदास केंद्राचे अस्तित्व सध्याच्या स्थितीत गंभीर आव्हानाचा सामना करत आहे. वेळेवर आणि प्रभावी प्रशासनिक उपाययोजना न झाल्यास इथे उरलेली 6 हरीणे ही लवकरच नामशेष होण्याचा धोका आहे. निसर्गप्रेमींना आणि प्रशासनाला एकत्र येऊन या केंद्राचे संचालन पुनर्रचित करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हरीणांचा हे नैसर्गिक ठिकाण फार लवकर इतिहास जमा ठरू शकतो.
























