भुसावळ दि . 2 (प्रतिनिधी ) गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक 18, पंचशील नगरमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या अतिशय गंभीर होत्या. पाण्याच्या तुटवड्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जिवनावर परिणाम होण्याचा धोका होता. या समस्या लक्षात घेता, या क्षेत्रासाठी अमृत योजने अंतर्गत पाईप लाईनचे काम लवकरात लवकर होणार यासाठी पाठपुरावा सुरु करण्यात आला होता.
पाठपुराव्याचा यशस्वी परिणाम
सातत्याने नगरपालिका प्रशासनाच्या विविध स्तरांवर भेट घेऊन तसेच मुख्यमंत्री व स्थानिक मंत्री ना . संजय भाऊ सावकरे यांच्याशी संवाद साधून या प्रश्नांचे निराकरण करणे गरजेचे असल्याची मागणी केली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या समस्येवर तातडीने लक्ष देता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कामास आवश्यक मार्गदर्शन आणि अडथळे दूर केले. यामुळे प्रभाग क्रमांक 18 (पंचशील नगर) मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाईप लाईनच्या कामास सुरुवात झाली.
उद्घाटन सोहळा आणि उपस्थित नागरिक
या महत्त्वाच्या कामाचे उद्घाटन सोहळा श्रीफळ फोडून विनोद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्यात नितीन धांडे, माजी नगरसेवक मुश्ताक शेख, बंटी नरवाडे, इंजिनिअर योगेश माळी, राहुल माळी, अल्ला बक्ष यांसह नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा उपस्थिती होती. पंचशील नगरमधील नागरिक व कामगार यांसह सर्वांनी या योजनेतील योगदानाचे कौतुक केले.
पाण्याच्या तुटवड्याचे निराकरण आणि समाजातील नागरिकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या योजनांचा महत्त्वाचा वाटा आहे. अमृत योजनेतील पाईप लाईनची मंजुरी केवळ पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरच नाही तर आरोग्य आणि आरोग्यदायी जीवन शैलीवर ही सकारात्मक परिणाम करू शकते. प्रभाग क्रमांक 18 मधील या यशस्वी पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या मानाने मोठा आनंद आहे आणि तो हा प्रयत्न इतर भागांसाठी देखील प्रेरणादायक ठरेल अशी आशा आहे.
























