Homeमहाराष्ट्रपाचोरा येथील पत्रकारांवर दाखल होणारे खोटे खंडणीचे गुन्हे _म.रा.पत्रकार संघ खपवुन घेणार...

पाचोरा येथील पत्रकारांवर दाखल होणारे खोटे खंडणीचे गुन्हे _म.रा.पत्रकार संघ खपवुन घेणार नाही – डॉ. विश्वासराव आरोटे

रावेर (प्रतिनिधी ) दि .22 पाचोरा येथील 4 पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्वरित निषेध करत स्पष्टपणे सांगितले की, राज्यभरातील कोणत्याही पत्रकारांवर हा गैरप्रकार सहन केला जाणार नाही. अवैध धंद्यांविरोधात प्रकाशित झालेल्या बातम्यांमुळे पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, यावर महाराष्ट्र पत्रकार संघ कडक पद्धतीने भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

पत्रकारांवरील खोटे गुन्हे म्हणजे लोकशाहीची गळचेपी..

अलीकडेच पाचोरातील काही पत्रकारांनी गेल्या महिन्यापासून अवैध धंद्यांविरोधात वेळोवेळी माध्यमातून आवाज उठवला होता.
या सत्य वृत्तांकनाचा राग मनात धरून पोलिस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी संगनमत करून पत्रकारांवर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पत्रकारांची स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. पत्रकार संघटनेने या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यभर आंदोलनांचा इशारा..

डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस यांनी ही बाब राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “अवैध धंदे उघड करण्याचे काम म्हणजे लोकहितासाठी केलेले पत्रकारांचे पवित्र कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या कामावर बंधने आणणे हा पत्रकारितेला बाधा पोहोचवणारा निषेधार्ह प्रकार आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ हे कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची अन्याय सहन करणार नाही.”

“आमच्या अंगात शेतकऱ्याचे रक्तआहे. जर वेळ आली तर आम्ही दोन हात करण्यासही मागे हटणार नाही.”असे म्हणत डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आंदोलनाचे संकेत दिले आहेत.

राज्यभरातील पत्रकारांनी कधी ही लोकांच्या हितासाठी आवाज उठवण्यास मागे हटलेले नाही. परंतु या घटनेमुळे पत्रकारांची काम करण्याचे स्वातंत्र्य व लोकशाही चा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे. डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांमध्ये एकजूट आणि संघटितपणा ठेवून योग्य न्यायासाठी लढा सुरू आहे. पत्रकाराच्या आवाजाला कुठलाही दबाव गप्प बसवु शकत नाही.हे लवकरच सिद्ध होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!