परभणी दि .25 (प्रतिनिधी ) रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर व रिपब्लिकन कामगार सेना राज्य अध्यक्ष कामगार सेना युवराज बनसोडे यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेनेने एक गंभीर निवेदन महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध दिले आहे. परभणीतील ज्ञानई नर्सिंग स्कूल, कारेगाव येथील G.N.M. प्रथम वर्षाच्या विद्यार्थी मुंकेश गणेश घोरगे याला महाविद्यालय प्रशासनाने परीक्षेचे हॉल तिकीट न दिल्यामुळे 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेतलेल्या परीक्षेस तो उपस्थीत होऊ शकला नाही.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचा अपमान; शैक्षणिक नुकसान
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर बोलावून, त्याला हॉल तिकीट न देता केंद्रावरच अपमानित केले आणि बाहेर काढल्याचा प्रकार गंभीर असून समाजात याचे तिव्र पडसाद उमटले आहे. प्राचार्य व प्राध्यापक यांच्या या हलगर्जी व अन्यायकारक वर्तनामुळे विद्यार्थ्याला केवळ शैक्षणिक नुकसानच नाही तर मानसिक त्रास देखील झाला आहे. अशा प्रकारची घडी शिक्षणसंस्थेच्या प्रतिष्ठेस ही धक्का देणारी आहे.
रिपब्लिकन सेनेची कठोर न्यायासाठी तातडीने कारवाई करावी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या वतीने महेंद्र सानके (जिल्हाध्यक्ष), कचरुदादा गोडबोले (जिल्हा उपाध्यक्ष), गंगाधर सपाटे (शहराध्यक्ष), व गणेश घोरगे (विद्यार्थी पालक) यांनी मा. जिल्हाधिकारी, परभणी यांना निवेदन देऊन संबंधित महाविद्यालय प्रशासनावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा अनैतिक घटनांना परवानगी न देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे निवेदनकर्त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क कोणत्याही परिस्थितीत पायमल्ली होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून योग्य तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. रिपब्लिकन सेना या प्रकारच्या अन्यायावर लक्ष ठेवून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर आवाज उठवणार असून, येत्या काळात अशा प्रकरणांबाबत कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मग तो कोणताही विद्यार्थी असो, त्यांचा हक्क सुरक्षित करणे आणि त्यांना शिक्षणाच्या योग्य संधी देणे हे प्राधान्य असले पाहिजे.
रिपब्लिकन सेनेची ही कृती विद्यार्थ्यांचे शिक्षण हक्क व सामाजिक न्याय जपण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाउल आहे. या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून संबंधित प्रशासनाने गतीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
























