यावल प्रतिनिधी दि .19 (मिलिंद जंजाळे ) न्हावी येथील ग्रामपंचायत अधिकारी प्रताप बोदडे यांच्या कडील न्हावी ग्रामपंचायतीचा कार्यभार काढुन मुख्यालय बदल करून दहिगाव येथे नेमणूक करून गटविकास अधिकारी यांनी मनमानी करून मा .विभागिय आयुक्त यांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे .
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार, वर्ग-३ गट क कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी किंवा पदस्थापनासाठी मा. विभागीय आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. तसेच तक्रारीवरून बदली करण्याची आवश्यकता असल्यास चौकशी करून अहवाल सादर करणे आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून परवानगी घेणे हे नियम निश्चित केलेले आहेत (दिनांक १५ मे २०१४, प्रकरण ०१).
न्हावी ग्रामपंचायत अधिकारी यांचे कडील न्हावी ग्रामपंचायतीचा कार्यभार काढुन मुख्यालय बदल करून दहीगाव येथे नेमणूक केली आहे . प्रताप बोदडे यांची बदली विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता करण्यात आली आहे. यामुळे ही बदली नियमविरोधी आणि मनमानी करत असल्याचा निषेध करण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे, पगार न्हावी येथूनच देण्यात येणे ही नियमांची पायमल्ली व उलंघन करणारी बाब आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे अधिकारांचा गैरवापर करून बदली करण्याचा अधिकार नसल्याने, अशा मनमानी बदली करणाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, अशी सुज्ञ नागरीकांकडून मागणी करण्यात येत आहे .
न्हावी ग्रामपंचायत अधिकारी प्रताप बोदडे यांची बदली मनमानी असल्याचा आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून विभागीय आयुक्तांची पूर्व परवानगी न घेता केलेल्या बदलीवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच, बदलीत असून ही पगार वाटप नियमांचे पालन सुनिश्चित करणे शासनाचे कर्तव्य आहे. यावर शासनाकडून लवकरच स्पष्ट मार्गदर्शन अपेक्षित आहे.
























