कोपरगाव दि .23 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) कोपरगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, धामोरी या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.डॉ.ठाकरे जे.एन. यांनी संस्था नियोजित प्रथम शाखामित्र भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची तपासणी व परीक्षण केले. तसेच शालेय अध्ययन – अध्यापन कामकाज, विद्यार्थी प्रगती, शाळेच्या भौतिक सुविधा, कार्यालयीन कामकाज व शाळेच्या अडीअडचणी अशा सर्वांगीण बाबींची माहिती घेऊन त्यांचे योग्य परीक्षण केले. त्यातील चांगल्या बाबींची प्रशंसा करून स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक सूचना त्यांनी सहविचार सभेत दिल्या. सदर शाखामित्र भेटीसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य व योगदान मिळाले. सदर भेटीस विद्यालयातील मा.मुख्याध्यापक श्री.बागल एस. टी. , पर्यवेक्षक श्री.जगदाळे एस. बी.सर तसेच श्री.गायकवाड सर, श्री.जेजुरकर सर, सौ. कातकाडे मॅडम, श्री.निकम सर, श्री.ठाकूर सर, श्री.माळोदे सर, श्री.कडाळे सर, श्री.घोडे सर, श्री.जुमडे सर, सौ. गागरे मॅडम, सौ. पावरा मॅडम, श्रीम.जायभाये मॅडम, श्रीम.सोनवणे मॅडम, श्रीम.वाघ मॅडम,श्री.गोसावी सर, श्री. बर्फे सर, श्री. आहिरे सर, श्री.सोनवणे मामा व श्री तुंबारे मामा हे सेवक उपस्थित होते.
























