Homeक्राईमनिंभोरा पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगीरी..चोरी करणारी टोळीचा पर्दाफास 12 लाख रुपये किंमतीचा...

निंभोरा पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगीरी..चोरी करणारी टोळीचा पर्दाफास 12 लाख रुपये किंमतीचा माल हस्तगत..सहा जणांना अटक..

रावेर दि . 15 प्रतिनिधी ( विनायक जहुरे ) रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसा पासुन निंभोरा पोलीस स्टेशन तसेच सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या परिसरातील शेतकरी यांचे शेती उपयोगाचे साहीत्य तसेच तोलकाटया वरील बॅटरी-इन्व्हेंटर साहीत्य व मोटार सायकल चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी  हरीदास बोचरे यांना वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे गेल्या १५ दिवसा पासुन धडक कार्यवाही करत साकळी पध्दतीने नाकाबंदी, रात्रगस्त करुन तांत्रीक व अधुनिक पध्दतीने तपास करुन व मिळालेल्या गुप्त माहिती वरुन दि. ११/०९/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास संशयीत इसम विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगांव नादी काठी याचा शोध घेतला असता तो पोलीस आल्याची चाहुल लागल्याने पळुन गेला त्याचे राहते घर झोपडी मध्ये त्याचे सोबत राहत असलेली महिला योगीता सुनिल कोळी हि मिळुन आली सदर झोपडी तपासली असता त्या मध्ये मो.सा. लहान सोलर प्लेट, नाळी इतर साहीत्य मिळुन आल्याने त्याबाबत कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता सदरचे साहित्य हे विलास ऊर्फ काल्या वाघोदे हा त्याचे शिरसाळा येथील साथीदार यांचे मदतीने चोरी करुन वडगाव येथील जमील तडवी, याचे मदतीने निंभोरा येथे राहणारा स्वप्नील चौधरी यास विकत असल्याची कबुली दिल्याने सपोनि हरीदास बोचरे यांनी निंभोरा पोलीसांच्या मदतीने चोरीचा माल घेणारा मुख्य सुत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी यास ताब्यात घेवुन त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचे घर व गोडावुन मधुन चोरी केलेल्या बॉटरी, इन्व्र्व्हटर मशिन व शेती साहीत्य तसेच इतर साहित्य वगैरे मिळुन आले आहे.

सदर प्रकरणात चोरी करणारा मुख्य आरोपी १) विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगाव नदीकाठी (फरार), हा असुन त्याचे सहकारी २) सौ. योगीता सुनिल कोळी रा. तपत कठोरा ह.मु. वडगांव नदीकाठी, ३) गोपाळ संजय भोलनकर, ४) आकाश मधुकर घोटकर, ५) अर्जुन रतनसिंग सोळंकी सर्व रा. शिरसाळा ता. बोदवड, हे आहेत. सदर आरोपी यांनी चोरी केलेला माल ताब्यात ठेवुन विल्हेवाट लावणारा आरोपी ६) जमील अब्दुल तडवी वय ४० रा. वडगांव तसेच सर्व चोरीचा माल घेणारा आरोपी ७) स्वप्नील वासुदेव चौधरी वय ३५ रा. निंभोरा बुा ता. रोवर हा असुन चोरीचा माल घेतलेले ८) राकेश सुभान तडवी वय ३२ रा. सावदा ता. रावेर, ९) ललीत सुनिल पाटील रा. निंभोरा बुगा ता. रावेर, १०) राहुल ऊर्फ मयुर अनिल पाटील रा. वडगांव ता. रावेर हे सदर आरोपी यांचे कडुन शेती साहित्य H.T.P. पंप मटेरीयल सोडण्याचे मशिन ५, मोठ्या साईच्या बॉट-या ११, लहान साईच्या बॉट-या-०३, इन्व्हर्टर मशिन-७, मोटार सायकल-४, पावर ट्रोलर लहान ट्रॅक्टर-२ नॅनो कार-१, सोलर प्लेट लहान-२, मटेरीयल बॅग-११, ठिबक नड्या बंडल-०३, तसेच इतर शेती व इलेक्ट्रीक साहित्य असा एकुण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन निंभोरा पोलीस स्टेशन कडील ०५ गुन्हे, यावल पो.स्टे.चे ०२ गुन्हे, रावेर पो.स्टे.चे ०१ गुन्हे, मुक्ताईनगर पो.स्टे.चे ०१ गुन्हे, सावदा पो.स्टे.चा ०१ गुन्हा, असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणुन निंभोरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आरोपी अटक करुन मुद्देमाल हस्तगत करुन धडाकेबाज कारवाई केली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो (भापोसे), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते सो, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपुर विभाग श्री. अनिल बडगुजर सो, यांचे मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि हरिदास शिवराम बोचरे यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि दिपाली पाटील, मपोउनि ममता तडवी, पोहेकॉ/३०६२ सुरेश अढायंगे, पोहेकॉ/१४ बिजु जावरे, पोहेकॉ/२७८२ रिजवान पिंजारी, पोना/१०८३ अविनाश पाटील, पोकॉ/२२३ किरण जाधव, पोकॉ/१४७१ रशिद तडवी, पोकॉ/२५०५ सर्फराज तडवी, पोकॉ/३२३७ रफिक पटेल, पोकॉ/२८२२ अमोल वाघ, पोकॉ/१००५ प्रभाकर ढसाळ, पोकॉ/१५९ प्रशांत चौधरी, पोकॉ/१७४३ महेंद्र महाजन, पोकॉ/१९२९ परेश सोनवणे, पोकॉ/२१५५ भुषण सपकाळे, पोकॉ/१०१६ सुभाष शिंदे, तसेच चालक पोहेकॉ/१०५५ योगेश चौधरी व पोकॉ/३०८५ राहुल केदारे यांचेसह महिला पोलीस अंमलदार यांनी केली आहे. त्याच प्रमाणे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि / सोपान गोरे, पोहेकॉ/२८०९ प्रितम पाटील, पोहेकॉ/१६१६ यशवंत टहाकळे, पोकॉ/३३४१ बबन पाटील, पोकॉ/११२५ प्रदिप चवरे, पोकॉ/०९ प्रदिप सपकाळे, पोकॉ/५९८ मयुर निकम, पोकॉ/८७८ सचिन घुगे यांनी कारवाईकामी भरीव मदत केली आहे.

सदर गुन्हे उघडकीस आणुन उत्कृष्ठरित्या कामगीरी केल्याने पोलीस दलाचे रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व शेतकरी व परिसरातील नागरीकांनी कौतुक करुन जनमानसात सुरक्षेची भावना निर्माण झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!