Homeताज्या बातम्याधोंडखेडा अवैध दारूबंदी , पँथर सेनेचे कडक इशारा प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण स्थगित....

धोंडखेडा अवैध दारूबंदी , पँथर सेनेचे कडक इशारा प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण स्थगित….

बोदवड दि . 9 (प्रतिनिधी)  बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथे अवैध दारू विक्री विरोधात ऑल इंडिया पँथर सेना तर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते. दिनांक 08 सप्टेंबर 2025 रोजी तहसील प्रशासनाने दारूबंदीबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व युवा उपजिल्हाध्यक्ष संदीपमाऊ सुरडकर, जिल्हा सचिव सागरभाऊ बावस्कर, तालुकाध्यक्ष अबरार शेख, भुसावळ तालुका अध्यक्ष मंगलभाऊ भालेराव यांनी केले. या प्रसंगी रिपब्लिकन सेना कार्यकर्ते ईश्वरभाऊ सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल दांडगे, रवि दांडगे, मयुर रामटेक, ब्रिजेश दांडगे तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासोबतच अशोक तारू साहेब व त्यांची टीम धोंडखेडा गावात जाऊन दारू विक्रेत्यांच्या घरी भेट दिली आणि सांगितले की “यापुढे कोणीही दारू विकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.” या प्रसंगी गावातील सरपंच, पोलीस पाटील, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार बोदवड प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देऊन समस्या लक्षात घेत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शुक्ल विभागाचे अधिकारी जळगाव येथून उपस्थित होते आणि त्यांनीही घटना प्रत्यक्ष पाहून प्रशासनाकडून दखल घेण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, गावातील अवैध दारूबंदीबाबत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र दारूबंदी पूर्णपणे न झाल्यास दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा पँथर सेनेतर्फे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!