कोपरगाव दि 23 प्रतिनिधी (नवनाथ उल्हारे ) कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
सदर जयंती दरम्यान कर्मवीरांची प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते व तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बागल एस टी यांच्या हस्ते ही करण्यात आले. प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर भव्य दिव्य स्वरूपात धामोरी गावातून मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीमध्ये लेझीम नृत्य झांजपथक टपरी नृत्य टाळ नृत्य असे अनेक नृत्य भैरवनाथ चौकात विद्यार्थ्याकडून सादर करण्यात आले. या नृत्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची वेशभूषा करून सहभाग घेतला विद्यार्थ्यांचे या कलाकृतीचे गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. तसेच मिरवणुकीत स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री रामराव माळी अरुण पाटील भाकरे तसेच पत्रकार श्री निवृत्ती शिंदे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बागल एसटी पर्यवेक्षक श्री जगदाळे एस.बी तसेच सर्व शिक्षक रुंद शिक्षकेतर सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
























