रावेर दि . 22 (प्रतिनिधी ) महाएकता फाउंडेशन तांदलवाडी आणि आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका यांच्या व महाएकता फाउंडेशन तांदलवाडी चे अध्यक्ष योगेश्वर कोळी आणि ग्रामपंचायत सदस्या सौ साधना योगेश्वर कोळी यांच्या माध्यमातून शुभ दीपावली उत्सव निमित्त तांदलवाडी सारख्या ग्रामीण भागात अहोरात्र कार्य करुन सेवा पुरविणारे डॉक्टर , महसूल विभागातील अधिकारी तलाठी व कर्मचारी , पोलिस पाटील , जि.प.शाळेतील शिक्षक वृंद , ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी , कर्मचारी , सफाई कर्मचारी , आशा सेविका , अंगणवाडी सेविका व मदतनीस , तांदलवाडी गावातील विद्युत मंडळ कर्मचारी , आणि तांदलवाडी गावातील पत्रकार मित्र यांच्या ग्रामीण भागातील सततच्या सहकार्याबद्दल त्यांना दिवाळी निमित्त उत्तम आरोग्य समृद्धी
आणि यश लाभावे अशी सदिच्छा देण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील आणि तांदलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुरेखा सिद्धार्थ तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित रावेर लोकसभा प्रमुख श्री नंदकिशोर भाऊ महाजन , स.गा.नि.यो.समिती अध्यक्ष श्री छोटुभाऊ पाटील , माजी.जि.प.सदस्य श्री आत्माराम दादा कोळी , कृ.उ.बाजार समिती मा.सभापती श्री श्रीकांत भाऊ महाजन , जि.अ.कोळी महासंघ जळगाव श्री हरीलाल भाऊ कोळी , शिवसेना संघटक श्री पंकज भाऊ कोळी चांगदेव , निवृत्त ग्रामविस्तार अधिकारी श्री संतोष आप्पा सपकाळे सिंगत , तांदलवाडी तलाठी मॅडम स्मिता कोळी , तांदलवाडी सरपंच सौ सुरेखा तायडे , मा.उपसरपंच तथा सदस्या आशाताई पाटील , मा.उपसरपंच कलावती कोळी , आदिवासी कोळी महासंघ जिल्हा महासचिव श्री मनोहर भाऊ कोळी सुलवाडी , ग्रामपंचायत सदस्य श्री शशांक भाऊ पाटील , श्री नारायण पाटील, श्री प्रमोद भाऊ उन्हाळे , श्री अरूण पाटील , डॉ . विजय पाटील , डॉ.सारंग पाटील , डॉ .एल.जी.पाटील . डॉ.सुमित पाटील , आरोग्य सेवक सुरेश तायडे , सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ तायडे सर , सागर खवले , सत्तार भाई , मनोज चौधरी , साई कोळी , यांच्या सह अंगणवाडी , आशा सेविका , पोस्ट हॉपीस कर्मचारी , ग्रामपंचायत कर्मचारी , महावितरण कर्मचारी , आणि पत्रकार मित्र यांच्या सह तांदलवाडी ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तांदलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुरेखा सिद्धार्थ तायडे यांना देऊन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दत्तात्रय तायडे गुरुजी यांनी करुन आभार महाएकता फाउंडेशन तांदलवाडी चे अध्यक्ष योगेश्वर कोळी यांनी केले .





















