Homeताज्या बातम्यातिरंग्याखाली स्वातंत्र्याचा जल्लोष ... महाजन आय.टी.आय.मध्ये साजरा झाला ७८वा स्वातंत्र्य दिन

तिरंग्याखाली स्वातंत्र्याचा जल्लोष … महाजन आय.टी.आय.मध्ये साजरा झाला ७८वा स्वातंत्र्य दिन

रावेर दि . 16 ( प्रतिनिधी ) महाजन अशासकीय आय.टी.आय. येथे देशभक्तीच्या उमेदाने नूरलेला ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्राचार्य अशरफ तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारोह पार पडला. राष्ट्रगीताच्या सुमधुर तरंगांनी परिसर गजरला आणि प्रत्येकास हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली.

स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वाची जाणीव करून देत, प्राचार्यांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. यावेळी नवीन प्रवेश केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी “माझा देश – माझा अभिमान” या घोषणांनी कार्यक्रमाचा भार वाढवला. त्यांचे देशप्रेमावर आधारित उद्बोधक शब्द उपस्थितांचे मन उंचावणारे ठरले.

कार्यक्रम समारंभ रंगीबेरंगी पताका, तिरंगा झेंडे, सुंदर फुलांच्या आरास आणि आकर्षक रांगोळ्यांनी सजला, ज्यामुळे परिसरात स्वातंत्र्याचा उत्सव रंगला. या उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक उपस्थिताला खास अल्पोपहार दिला गेला, ज्याने आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निदेशक वर्गाच्या  सागर चौधरी, कृष्णा पाटील,  गणेश महाजन,  सागर वाघोडे,  तुषार पाटील यांच्यासह शिपाई सागर भाऊ यांनी शिस्तबद्ध तैयारी करून महत्त्वाची भूमिका बजावली.

महाजन आय.टी.आय.चा हा ७८व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष केवळ एक कार्यक्रम नसून देशभक्तीची जाणीव वाढवणारा व युवकांमध्ये नवचैतन्य रुजवणारा ठरला. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने आपल्या तिरंग्याखाली देशभक्तीची शपथ घेऊन उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!