Homeताज्या बातम्यातापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला मिळणार — रुग्णांना मोठा दिलासा...

तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला मिळणार — रुग्णांना मोठा दिलासा आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

रावेर दि .1 (प्रतिनिधी ) किडनीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रावेर ग्रामीण रुग्णालयात शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक जागा रुग्णालय परिसरात उपलब्ध करून देण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे रावेर शहरासह परिसरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना जळगावपर्यंत जावे लागत होते. त्यामुळे वेळ, प्रवासाचा त्रास आणि आर्थिक खर्च या तिन्ही अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही सेवा थेट रावेर ग्रामीण रुग्णालयातच उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे, या परिसरातील हे पहिलेच शासनमान्य डायलिसिस सेंटर असणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागत असतो. परंतु शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सर्वसामान्य रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.

या संदर्भात आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले, “रावेर आणि परिसरातील नागरिकांसाठी शासनमान्य डायलिसिस सेंटर ही मोठी सुविधा आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. रुग्णांना आता जळगावपर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. ग्रामीण रुग्णालयात आधुनिक सोयींनी युक्त हे केंद्र सुरू होणार असून, पुढील काळात आणखी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.”

या निर्णयामुळे रावेर, यावल, फैजपूर, मुक्ताईनगर तसेच परिसरातील किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना थेट लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे परिसरातील नागरिक आणि रुग्णांनी स्वागत केले असून, आमदार अमोल जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!