यावलतालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) चोपडा यावल मतदार संघातील आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून झालेले किनगाव येथिल ग्रामीण रुग्णालयाचे संपूर्ण बांधकाम झाले असतांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणुन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी किनगाव येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले आणि बांधकाम पूर्ण ही झाले मात्र अजुन ही किनगाव येथिल ग्रामीण रुग्णालय बंद अवस्थेतच आहे.
यावल तालुक्यातील किनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असतांना मोठ्या लोक संख्येचे गाव असल्याने व आजूबाजूच्या गावांचा विचार करून किनगाव येथे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणून उत्कृष्ट अश्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले असुन किनगाव सह परिसरातील नागरिकांना उत्तम अश्या आरोग्य सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय उभारले असतांना अजुन ही किनगाव येथिल ग्रामीण रुग्णालय बंद अवस्थेत असल्याने नागरिक मात्र ग्रामीण रुग्णालय कधी सुरु होणार आणि उत्तम अशी आरोग्य सेवा कधी मिळणार या अपेक्षेत मात्र नागरिक आहेत तरी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी लक्ष केंद्रित करून किनगाव येथिल नविन ग्रामीण रुग्णालय सुरु करावी अशी सामान्य नागरिकांनकडुन मागणीस जोर धरत आहे.किनगाव येथे राजस्व अभियान कार्यक्रमात उपस्थित असलेले आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की कर्मचारी नसल्यामुळे किनगाव येथिल ग्रामीण रुग्णालय बंद आहे पण लवकरच त्याठिकाणी कर्मचारी वर्ग आणून ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात येऊन उत्तम अशी आरोग्य सेवा नागरिकांना दिली जाईल व किनगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र मालोद येते नविन ईमारत उभारून आदिवासी भागातील नागरिकांना प्राथमिक उपचारासाठी नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मालोद उभारले जाईल .
























