बोदवड दि .18 ( प्रतिनिधी )जामनेर पंचायत समितीला नुकतेच आय ,एस ओ मानांकन मिळाले असून त्या पंचायत समिती अंतर्गत मोयखेडे दीगर ग्रामपंचायतचे ग्राम रोजगार सेवक घरकुलच्या लाभार्थ्यांना शौचालयाचे मस्टर काढण्यासाठी हजार रुपयाची मागणी करीत आहे. यामुळे सरकारला गरिबाला मोफत घरकुल देत असताना ग्राम रोजगार सेवक मात्र लाभार्थ्यास पैशाची मागणी करत आहे. एकंदरीत या गावांमध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांनी घरकुल चे बांधकाम न करता अनुदान लाटली असून गरजू व पात्र लाभार्थी वंचित असल्याचे दिसून येते.जामनेर तालुक्याला पंचायत समितीला नुकतेच आय.एस.ओ. मानांकन मिळाले असून त्या पंचायत समिती अंतर्गत रोजगार सेवक मात्र लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत आहे गावामध्ये फेरफटका मारला असता गावातील नागरिकांनी असे सांगितले की रोजगार सेवक हा शौचालयाचे अंतिम हप्त्याचा निधी मिळण्यासाठी ,पैसे काढण्यासाठी पैशाची मागणी करतो . ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश चव्हाण हे कार्यालयीन कामकाजाच्या अगोदर मुख्यालय सोडून मिटींग असल्याचा बहाणा करून निघून गेले. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलचे बांधकाम न करता कागदोपत्री घरकुल पूर्ण दाखवून शासनाची फसवणूक केलेली आहे.एकच कुटुंबात दोन तीन लाभ दिले आहेत .यामध्ये ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत अधिकारी व गृहनिर्माण अभियंता राहुल चव्हाण यांच्या संगणमताने शासनाचे फसवणूक होत आहे .ग्राम रोजगार सेवक पैश्याची मागणी करतो असे मोयखेडे दीगर येथील घरकुल लाभार्थी श्रीराम दलाधन चौधरी यांनी आमच्या लक्षवेध न्युज प्रतिनिधीश बोलतांना सांगितले .
























