Homeताज्या बातम्याजळगाव क.प. - मोरगाव बारामती रोडलगत हॉटेल्समध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरुच –...

जळगाव क.प. – मोरगाव बारामती रोडलगत हॉटेल्समध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरुच – पोलिस प्रशासन मात्र गप्प!तक्रारी, पुरावे असून ही कारवाई नाही; पोलिस आणि अवैध विक्रेत्यांमधील साटेलोटाचा संशय, नागरिकांमध्ये संताप

बारामती दि.०१ (प्रतिनिधी ) जळगाव क.प. मोरगाव या बारामती रोडलगत असलेल्या काही नामांकित हॉटेल्समध्ये खुलेआम सर्रासपणे अवैधरित्या दारू विक्री केली जात असून, प्रशासन मात्र गप्प बसले आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी, फोटो, व्हिडीओ आणि ठोस माहिती देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

या प्रकारामुळे स्थानिक जनतेत तीव्र नाराजी आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर थेट पोलिस प्रशासन आणि हॉटेल चालकांमधील “साटेलोटा” असल्याचा आरोप केला आहे. कायद्याच्या थेट उल्लंघनाचा प्रकार खुलेआम सुरू असताना कारवाई न होणं ही बाब संशयास्पद आहे.

माहिती मिळाली तरी कारवाई नाही –नागरिक हैराण दारूबंदी कायदा फक्त कागदावर उरला आहे का?”

हा प्रकार बघून तर पोलीसच या धंद्याचे संरक्षण करतायत की काय असं वाटतं.”अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत.

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

रोजंदारीने काम करणारे तरुण, प्रवासी आणि ट्रक चालक ही या हॉटेल्सची मुख्य ग्राहक मंडळी. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेला दारूचा हा अवैध व्यवहार कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर असून, त्यामुळे अपघात, वाद-विवाद व गुन्हेगारी प्रकार वाढण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडे मागणी – तत्काळ कारवाई करा

स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि जनप्रतिनिधींनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित हॉटेल्सवर तात्काळ छापे टाकून परवान्याशिवाय दारू विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!