बारामती दि .2 (प्रतिनिधी) जळगाव क.प परिसरात बिनधास्तपणे अवैध दारू विक्री सुरू असून, याविरोधात स्थानिक महिलांनी पत्रकारांमार्फत लेखी अर्ज करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
महिलांच्या मते, अनेक वेळा पोलिसांना माहिती दिल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. काही वेळा पाहणी करून गेले तरी विक्रेते पुन्हा त्या ठिकाणी सुरू करतात. त्यामुळे परिसरात गैरकृत्यांना चालना मिळत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून, जर वेळेवर कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
























