जळगाव दि .19(लक्षवेध न्युज नेटवर्क ) जळगाव शहर पोलीस स्टेशन हददीत दि. १४/०७/२०२५ रोजी रात्री २०.३० ते दि.१५/०७/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वा.चे दरम्यान जळगांव शहरातील गोलाणी माकंटच्या समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोर सार्व जागी १) ६१,०००/-रु.कि.ची फोर्स कं.ची. टेम्पो क्र.MH-१९०६६६ पांढ-या रंगाची जु.वा.कि.अं. २) ३०,०००/-रु.कि.ची किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोव्हॅटचा जनरेटर जु.वा.कि.अं. असे ९१,०००/- रु.किं.चा. मुद्देमालाची वाहन चोरी झालेली होती व त्या अनुषंगाने फिर्यादी मिलींद मुकुंद थत्ते रा. १३० नवीपेठ जळगांव ता.जि. जळगांव यांच्या फिर्यादवरुन शहर पो.स्टे. येथे गुरनं २७८/२०२५ BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखान करण्यात आलेला होता.
नमुद गुन्ह्यात मिळालेल्या माहीती व आरोपीचे वर्णानानुसार चोरट्याचा मा. पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी मा. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत पोलीस निरीक्षक सागर शिपी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सफी/सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेको/सतिश पाटील, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोहेकों योगेश पाटील, पोहेकों/विरेंद्र शिंदे, पोना/भगवान पाटील, पोको. अमोल ठाकुर, पोकों, पांचाळ, पोकों प्रणय पवार, पोको भगवान मोरे, यांना तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या व त्यानुसा गुन्हे शोध पथकाचे दोन टीम तयार करुन गुन्हे शोध पथकातोल कर्मचारी यांनी गुप्त बातमीदारा मार्फत व शहरातील तसेच राष्ट्रीय महामार्ग वरील सीसीटीव्ही फुटेज माहीती काढून आरोपी हे सदरचे बाहन घेवुन जामनेर, बोदवड मार्गे मलकापुर नांदुरा कडे गेल्याची गुप्त माहीती मिळाल्याने वरील एक टीम त्यामध्ये पोहेको सतिष पाटील, पोहेको नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोकों अमोल ठाकुर, पोकों भगवान मोरे हे त्यांच्या मागावर असतांना आरोपीतांनी सदरचे वाहन वडनेर भोईजी गावा जवळ अपघात करून सदरचे वाहन सोडून पळुन गेले होते. तेव्हा सदरच्या आरोपीबाबत अधिक माहीती घेत असतांना ते घटनास्थळा पासून काही किलोमीटर वर सदर आरोपी हे एका ढाब्यावर बसलेले मिळून आले. तेव्हा त्यांचे हावभाव व त्यांच्या अंगावरील जखमा बघुन त्यांना ताब्यात घेवून अधिक विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी त्याचे नाव 1) मंगेश सुनिल मिस्तरी वय-20 वर्ष, मु. रा. स्वामी समर्थ मंदीराच्या पाठीमागे, कांचन नगर जळगाव. ह.मु. साई वेल्डींग वर्कशॉपच्या गल्लीत शिरसोली ता जि जळगाव. 2) यश अनिल सोनार वय 20 वर्ष, मु. रा. समता नगर, साई बाबा मंदीराच्या पाठीमागे, विहिरीजवळ, जळगाव, ह.मू. ओम नगर, शिरसोली ता. जि. जळगाव असे सांगीतले. त्यांनी केलेल्या जळगांव शहरातील पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील जनरेटर व्हॅन तसेच इतर ठिकाणी चोरलेली १) टाटा एस छोटा हत्ती मालवाहतुक चारचाकी वाहन व ०५ मोटर सायकल असे एकुन २,३६,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हा त्यांच्या कडुन हस्तगत करण्यात आला.
पोलीस स्टेशन व गुरन,जळगाव शहर पो. स्टे.१) गुरंनं. २७८/२०२५ BNS ३०३(२) प्रमाणेपोलीस स्टेशन व गुरंन.जिल्हापेठ पोस्टे१. गुरंनं. १५९/२०२५ २. गुरंनं-१९२/२०२५
३.गुरंनं.-१९३/२०२५ पोलीस स्टेशन व गुरंन.एम आय डी सी पो.स्टे.१. गुरंनं ४५६/२०२५२. गुरंनं- ५१४/२०२५ पोलीस स्टेशन व गुरंन.
रामानंद नगर पोस्टे १) गुरंनं २६२/२०२५अशा प्रकारे जळगांव शहर पो. स्टे. गुन्हे शोध पथकाकडून चोरीस गेलेले एक जनरेटर व्हॅन, एक. टाटा एस मालवाहतुक चारचाकी वाहन व ०५ मोटर सायकल असे एकुण २,३६,०००/- रु.कि.चा मुद्देमाल हा त्यांच्या कडून हस्तगत करण्यात आला, व जळगांव भाग जळगांव यातील जळगांव शहर पो.स्टे. कडील – ०१ गुन्हा, जिल्हापेठ पो.स्टे. कडील ०३ गुन्हें, MIDC पो.स्टे. कडील- ०२ गुन्हे व रामानंदनगर पोस्टे कडील -०१ असे एकुण ०७ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक सो. श्री माहेश्वर रेड्डी सो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. अशोक नखाते उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप गावीत सो. मा. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांचे मार्गदर्शनाखाली जळगांव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकातील सफी/सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकों/नंदलाल पाटील, पोहेको योगेश पाटील, पोहेकों/विरेंद्र शिंदे, पोहेकों दिपक शिरसाठ, पोना/भगवान पाटील, पोकों, अमोल ठाकुर, पोकों/भगवान मोरे, पांकॉ. राहुलकुमार पांचाळ, पोकॉ. प्रणय पवार तसेच नेत्रम येथील कर्मचारी पोकों/पंकज खडसे, पोको/ मुबारक देशमुख अशांनी केली आहे .























