सांगली दि 24 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटीलने पैशाच्या चणचणीतून कंटाळून गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. हर्षल पाटील हा जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 40 लाखांच्या कामाचा कंत्राट घेतला होता, मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याला बिल न मिळेल्याने आर्थिक संकटात सापडला. कामाच्या प्रगतीवर देखील पैसे मिळाले नाहीत, त्याने 65 लाखांचा कर्ज घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता, पण वाढते कर्ज आणि आर्थिक ताणतणावामुळे शेवटी त्याने आपले आयुष्य संपवले.
जलजीवन मिशनमधील बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदाराचा आर्थिक ताण
हर्षलने जलजीवन मिशन अंतर्गत कामावर मेहनत घेतली, परंतु प्रशासनाकडून ठरलेले बिल आणि पैसे मिळत नव्हते. या कारणास्तव त्याचा कर्जाचा बोझा वाढत राहिला. सांगलीतील विविध कंत्राटदारांचे ही हजारो कोटींचे बिल थकेलेले असून त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्यात कंत्राटदारांचे सुमारे 80 हजार कोटी रुपये थकलेले असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत अनेक तरुण कंत्राटदारांनी याप्रमाणे आपले भविष्य आणि जीवन गमावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कंत्राटदारांच्या आत्महत्येमागील प्रश्न; प्रशासन आणि शासनाची भूमिका?
हर्षलच्या आत्म हत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित होण्यास भाग पडले आहेत. ही केवळ आत्महत्या आहे का, की शासन व प्रशासनाने शुल्क आणि टक्केवारीसाठी केलेल्या दबावामुळे हा ‘राजकीय’ किंवा ‘आर्थिक’ खून झाला आहे? कंत्राटदारांच्या लाखोंच्या थकबाकीकडे सरकारचे दुर्लक्ष करण्याची सावकारी असून, अनेक कंत्राटदार हर्षल सारखेच संकटात आहेत.
सांगलीतील हर्षल पाटीलच्या आत्महत्येने राज्यातील कंत्राटदारांच्या दुर्दशेची सखोल चित्र प्रसारित केली आहे. जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या योजनांतर्गत काम करणाऱ्या तरुणांना वेळेवर पैसे न मिळणे ही गंभीर समस्या आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने कंत्राटदारांच्या अडचणींना गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना आखाव्या, नाहीतर हे संकट आणखी सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या वाढू शकते.
हर्षलच्या दु:खद आत्महत्येने सरकार आणि प्रशासनाचा विचार करण्यास भाग पाडले आहे. कंत्राटदारांचे थकलेले बिल, वाढता कर्जाचा ओझा, आणि त्याचा मानसिक ताण याबाबत त्वरित कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तरुण कंत्राटदारांची अशी दुर्दशा आधीच असलेल्या आथिक बोझ्यामुळे वाढत राहतील .
























